नांदेड जिल्ह्याला ५२ रूग्णवाहिका मंजूर

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.2मे):-राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रूग्णवाहिका मंजूर झाल्या असून, त्यातील बहुतांश रूग्णवाहिका जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज या रूग्णवाहिकांचे प्रातिनिधिक लोकार्पण झाले. या रूग्णवाहिकांमुळे ग्रामिण रूग्णांना मोठी मदत होईल.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रूग्णवाहिका मंजूर करण्यासंदर्भात पालकमंत्री म्हणून माझ्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा आभारी आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED