ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णांमुळे समुद्रपुर, सिंदी रेल्वे येथे कोविड सेंटर तात्काळ सुरू करा- मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.2मे):- कोरोना या महामारीने आपले उग्र रूप धारण केल्यामुळे समुद्रपुर, सिंदी रेल्वे या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेनदिवस मोठया प्रमाणात वाढ होत आहे हे दिसून येत आहे त्यामुळे रूग्णालयामध्ये बेड चा तुटवडा निर्माण झाला असून ऑक्सिजन ची सुध्दा कमतरता आहे परिणामी यामुळे अनेक कोविड रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू होत आहे. समुद्रपुर, सिंदी रेल्वे या भागातील कोविड रुग्णांची तसेच त्याच्या परिवाराची धावपळ होत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यातच ऑक्सिजन असलेली रुग्णवाहिका शहरात उपलब्ध नाही आहे.

या सर्व गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.अतुल वांदिले यांनी समुद्रपुर, सिंदी रेल्वे या ग्रामीण भागात प्रशासनाने तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे तसेच ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये ५० ते ६० खाटांचे बेड रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावा करिता पुढाकार घेतला असून शासनाकडून तसेच प्रशासनाकडून त्याकरिता परवानगी देवून ऑक्सिजन तसेच डॉक्टर ची व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या आणि ग्रामीण आरोग्य रुग्णालयामध्ये बेड लवकरात लवकर वाढवण्यात यावे. असे अतुल वांदिले यांनी प्रशासनाला मागणी केली आहे.
——————————————समुद्रपुर, सिंदी रेल्वे या परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तेथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांची गैरसोय होत आहे तेथे बेडची तुटवडा व ओक्सिजन कमतरता सुद्धा आहे त्यामुळे या भागात प्रशासनाने तातडीने कोविढ सेंटर सुरू करावे तसेच या भागातील ग्रामीण रुग्णालयामध्ये बेड ची संख्या ५० ते ६० अशी वाढवण्यात यावे.

-अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED