सिंदीत व्हावे ६० खाटांचे कोविड केंद्र

🔸आरोग्य वर्धिनी केंद्राची माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली पाहणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.2मे):-सिंदी रेल्वे येथील आरोग्यवर्धिनी केंद्राला दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी अचानक भेट दिली. सुसज्ज इमारतीशिवाय तेथे सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचे बघून त्यांना धक्काच बसला. पालिका कार्यालयात जाऊन नगराध्यक्ष बबीता तुमाने व सहकाऱ्यांशी चर्चाही केली आणि त्वरित कोविड केंद्राची मागणी करण्याचा ठराव मंजूर करा, असा सल्ला दिला त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयचे गटनेता आशिष देवतळे, नगरसेवक ओम राठी, नगरसेविका चंदाताई बोरकर, नगरसेविका सुमनताई पाटील, नगरसेवक विलास तळवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष वसंता शिरसे पत्रकार नरेंद्र सूरकार इत्यादी उपस्थित होते.

नगरपरिषद ०२ कोटी खर्च करण्यास तयार आहे. आपण सर्व पुढाकार घेऊन हे कोविड सेंटर सरकारच्या सौजन्याने उभारण्यास मदत करू असे जाहीर केले. शहरात व परिसरातील अधिकांश गावे बाधित असून रोज संख्या वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या सौजन्य कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी भेट दिली तेव्हा या प्रशस्त इमारतीत सहा खाटा आहे परंतु सोयीसुविधा नसल्यामुळे एकही बाधित रुग्ण असल्याचे जाणवले नाही. जिल्हा प्रशासन या महामारीतही सुस्त झाल्याचे जाणवल्याचा अभिप्राय त्यांनी नोंदवला, हे विशेष! त्यानंतर नगर पालिका यांच्या उपस्थितीत सभागृहात आयोजित एका बैठकीत येथे ६० खाटांचे कोविड केअर सेंटर देण्यात यावे त्यासाठी नगरपरिषद ०२ कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे असा ठराव घेण्यात आला.
यासंदर्भात माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क करून कोविड सेंटर मंजूर करण्यासाठी पुर्ण ताकत लावण्याची तयारी केली आहे व निवेदना द्वारे सांगितले की कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सरकारी दवाखाना सांगली हॉस्पिटल सेवाग्राम हॉस्पिटल येथे कोविड सेंटर सुरू असताना सुद्धा, रुग्णांची हेळसांड होत आहे कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दवाखान्यात बेड उपलब्ध नाही, त्यामुळे रुग्ण सेवा अपुरी पडत आहे सर्व कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नाही त्यामुळे कॉर्पोरेट रुग्णांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. नगरपरिषद सिंधी रेल्वे यांनी भविष्याचा वेध घेत वैशिष्ट्यपूर्ण ग्रहांचा निधी सेंटर उभारण्यासाठी वळता करावा असा ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे.

तरी नगरपरिषद सिंधी रेल्वे यांना कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे ,जिल्हाधिकारी देशभ्रतारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मोरे व सिव्हिल सर्जन डॉ.तडस यांना उपविभागीय अधिकारी वर्धा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED