तांडव- काळ्याबाजाराच,अग्निचं की महामारीच?

38

१ ऑक्टोंबर २०२० नंतर भारतातील कोविड केसेस डिक्लाईन होऊ लागल्या आणि भारताचा नॅशनल रिकव्हरी रेट हा सर्वात हायस्ट ठरला. तसेच भारताने अमेरिकेला कठीण काळात बॅन असलेल्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन देऊन जगासमोर एक उदाहरण प्रस्थापित केले. एवढेच नव्हे तर भारत हा जगातील सर्वाधिक वॅक्सिन पुरवठा करणारा एकमेव देश ठरला आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर ९० देशांना भारताने वॅक्सिन पुरवले आहे. मग असं काय झालं या पाच महिन्यातच की भारताची आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे? असं काय झालं या पाच महिन्यातच की महाराष्ट्र हा पूर्णपणे कोलमडून गेला आहे? काही दिवसांपूर्वीच मीडियाच्या हेडलाईन होत्या की, भारताने बनवलेल्या वॅक्सिन मुळे जग कोविड ह्या महामारी पासून वाचू शकते.आणि आता भारतीय स्ट्रेन मुळे भारतीया वरती बंदी…
मग नेमकं अस काय घडतय आपल्या भारतात आणि आपल्या महाराष्ट्रात ?.

फेब्रुवारीच्या मध्यांतर मध्ये कोरोनाचा नेशनल रिकवरी रेट ९७.३२% होता आणि महाराष्ट्राचा रिकवरी रेट 94% त्यातच.आणि महत्वाचं म्हणजे Vaccine ड्राईव्ह जानेवारी पासून हेअल्थ केअर वर्कर साठी सुरू झाला होता…मग काय उभा देशच सुस्थ झाला आणि एक वेगळाचं आत्म विश्वास देश वाशीया मध्ये दिसला तो म्हणजे, “Vaccination Drive is started, and India will kick Coronavirus”
पण झालं उलटच १ मार्च २०२१ पासून कोविडच्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढायला लागली आणि २५ एप्रिल रोजी देशाचा रिकवरी रेट ८३.०५% आणि महाराष्ट्राचा रिकवरी रेट ८२.१९% वरती पोहोचला थोडक्यात काय तर Coronavirus started kicking back to India & Indian’s bumb badly… का तर Indian’s underestimate to coronavirus totally ….पण आता इंडिया गेट वेल सुन म्हणायची वेळ आली..

vaccination drive सुरु झाला खरा आणि या पासून बचाव ही होत आहे. ही जरी दिलासादायक गोष्ट असली तरी अनास्थाने का होईना या vaccination सेंटर लाच या देशातील जनतेने सुपर sprader पॉईंट ठरवले आहे.ते कसे?. लस देताना लस देणारा आणि लस घेणारा हे दोघेच असायला हवे पण नाही आम्ही जाहिरातबाज, ते पहिली लस अमुक ला टोचली, मग सोबत मिडिया,फोटो काढायला, गर्दी करायला! कुतुहल काय तर ते I am vaccinated and photo’s will set upload to social platforms.अहो काय हे आणि किती हे उघड्या दंडाचे प्रदर्शन. फोटोज काढून आणि सोशल मिडिया ला उप लोढ करून काय भारत रत्न पटकवणार आहात? की स्पर्धा आयोजित केली होती भारत सरकारने? की उघड्या दंडाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले नाही तर लसीचा दुसरा डोस मिळणार नाही! थोडक्यात काय नॅशनल रिकव्हरी रेट १००% उदिष्ट पूर्ण करण्या आधी आणि महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट १००% पूर्ण होण्याआधीच हा पोरखेळ चालू झाला होता. आता तर ६० वर्षांवरील जेष्ठ यांची पण भर झाली होती.

मग काय, कोरोनाचा डोस घेण्यासाठी नोंदणी करण्यासाठी उडालेली तारांबळ आणि डोस घेण्यासाठी सेंटर मध्ये वरिष्ठ नागरिक आणि इतर नागरीकाची झालेली गर्दी. ती गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झालेली मारहाण. डोस मिळत नाही म्हणून कर्मचार्याला मारहान अगदी हात पाय तुटेपर्यंत… कदाचित पब्लिक विसरली असेल हे सर्व पण… विसरून नाही चालणार कारण हेच कारण पुढे सुपरस्प्रेड ठरत गेली आणि भविष्यात ठरतील हि.आणि मग काय नवीन आलेला डबल मिय्टंट असो कि ट्रिपल मिय्टंट असो… आता तर Quadri आनी पेंटा स्ट्रेन पण जन्माला येणार का याचीच भीती मनाला भेडसावत राहते.. वाढणारा कोरोना आणि कमी पडत चाललेले वेक्सिन मधील दरी भरून काढण्याला जराही कमी कसर पडू दिली नाही या काळ्याबाजाराने आणि काळाबाजार करणारर्यानी! महामारी म्हटलं की, मन सुन्न करून सोडणारी परिस्थिती इथे आमच्या सारख्यांची कल्पनाशक्ती स्पर्श ही करू शकत नाही तिथे काळा बाजार करणाऱ्यानी बाजी कधीच मारलेली असते..

मग काळा बाजार औषधांचा असो, रुग्णालयातील खाटाचाअसो,चाचणी चा असो, प्राणवायूचा असो, किंवा अगदी अंत्यसंस्काराचा असो… थोडक्यात काय पैसा कमवण्याच्या एकाही मार्गात तसूभरही मागे पडायचं नाही असं या काळात बाजारात करणाऱ्यांनी निश्चय केलेला दिसतो. पण त्यांच्याच उलट सिने अभिनेता सोनू सूद, क्रिकेटर संजय बांगर,आणि ऑलिंपिक प्लेयर आपले सर्व मेडल विकून कोविड रुग्णांना मदत करतात. रतन टाटा यांनी तर पुन्हा एकदा ऑक्सिजनचा मोफत पुरवठा केला आणि त्यासोबत देशातील अनेक उद्योगपतीने आपापल्यापरीने आपले कर्तव्य निभावताना दिसून येत आहे. एकी कडे .गिळणारा तर दुसरी कडे सडळ हाताने देणारा अस चित्र सध्या पाहायला मिळत आहे..९ जानेवारीला भंडारा येथे झालेल्या अग्नितांडव तर मन सुन्न करणारे होते. ती घटना कशी झाली, कोणामुळे झाली याचा पाठपुरावा करण्यात मिडिया आणि यंत्रणा इतकी गाफील राहिली की भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कुठलाच ॲक्शन प्लॅन मात्र कुठेच राबवलेला दिसला नाही. किंवा कुठूनही ऐकायला मिळाले नाही.

मुंबईमधील भांडुप या ठिकाणी मॉल मध्ये असलेल्या रुग्णालयात अग्नितांडव होऊन झालेली दुर्घटना किंवा विरार मधील एका रुग्णालयात आगीमुळे झालेली दुर्घटना. विरार मधील रुग्णालयात आग लागल्याने तेरा रुग्णांचा मृत्यू असू दे किंवा नाशिक मधील हॉस्पिटल मध्ये झालेली ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यू पडलेले लोक. या सर्व घटना खूपच चित्तथरारक आहेत पण होतं काय? ना रेगुलर ऑडिट होतात ना ॲक्शन प्लॅन बनवतात ना कुठे सुधारणा होतात आणि आहे असंच चालू राहणार.. एकीकडे वाढत चाललेली महामारी आणि त्यात हा अग्नीचा तांडव जणू निसर्गाचा रुद्र रूपच पाहायला मिळत आहे पण यातून कोणाला बोध मात्र घ्यायचा नाही. मात्र ईथुन पुढे येणाऱ्या काळात या घटनांची पुनरावृत्ती तर होणार नाही ना म्हणून काही ठोस पावले उचलली जातात का ते पाहायचे काम करावे लागेल. या महामारी ने तर सर्वांचीच तारामबळ झाली आहे की आज प्राणवायू विकत घ्यावा लागत आहे…

खाटासाठी धावपळ करून रुग्णालयात बेड मिळत नाहीयेत ,औषध पुरवठा होत नाही आणि लसीकरणाच्या वेगही मंदावला आहे पहिली लाट आली तेव्हा कोरणा बद्दल जगाला त्याच्या बद्दल काहीच माहिती नव्हते दररोज नवीन नवीन शोध ,नवीन तर्क वितर्क चालू होते आणि तरीही नॅशनल रिकवरी 98% च्या घरात पोचला होता. फरक राहिला होता तो फक्त 2% पण जनतेचा धीर सुटला आणि प्रशासन सुधा गाफील राहिला. गाफीलपणा इतका वाढत गेला… आणि त्यांना सोकोल टायटल *COVID WORRIOR’S*, कोरोना योद्धे म्हणून ज्यांना सन्मानित केल्यात त्यांच्यात मेहनतीवर पाणी फेरलात.पूर्ण जगाला कल्पना होती सेकंड वेव्ह ची मग पहिल्या वेव्ह मधून सावरल्यावर दुसर्‍या वेव्हला सामोरे जाण्यासाठीची यंत्रणा सुसज्ज का नाही राहिली? का इतका गाफिलपणा आणि का हा तांडव? का इथे रुग्णांना त्यांचे प्राण प्राणवायू बेड अभावी रुग्णालयाच्या दारातच गमवावे लागतात?

अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाहीये, कोरोना ची तिसरी वेव्ह सुद्धा येऊ शकते तर आरोग्य यंत्रणेला खचून न जाता आजपासून येणाऱ्या ३,४,५,६ कितीही वेव्ह आल्या तरी खंबीरपणे लढण्यासाठी सुसज्ज राहिल्याशिवाय पर्याय नाही. या महामारीची झळ महाराष्ट्रातल्या कुठल्याच कुटुंबातील सोसली नाही असं नाहीय. कुणाचा मुलगा, मुलगी बहीण, भाऊ, पत्नी, पती, नातू, आजोबा, आजी मामा, मामी काका असं कोणी ना कोणी या कोवीडमध्ये गमावलं आहे पण माझ्यासारखा हेल्थकेअर वर्कर ने रोज वरील पैकी कोणाला ला कोणाला तरी गमावताना खूप जवळून अनुभवला आहे. वर्षे २०२० मध्ये मामा आणि भाऊजींची आई यांना आम्ही कोवीडमध्ये गमवला होता पण आता अजून कुणाला गमवण्याची हिम्मत आता आमच्यात नाही.. तरी सर्वांनी आपल्या परिवाराची काळजी घरी राहुनच घ्यावी ..यातच आपली आणि आपल्या कुटुंबाची भलाई आहे.. मी आणि माझ्यासारखे करोडो नर्सेस आणि डॉक्टर रोज मन सुन्न करणाऱ्या घटनांना सामोरे जात आहेत.

पेशंटची जबाबदारी सांभाळता सांभाळता स्वतःची काळजी घ्यायची भान आम्हाला राहात नाही आपले 100% देऊन आज प्रत्येक हेअल्थ वर्कर आपल्या घरापासून दूर राहून आज तुमच्यापैकी कुणाच्या वडिलांचे आईचे,भावाचे, व बहिणीचे रोज प्राण वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावून अहोरात्र झटत आहेत त्यांच्याच जीवाशी प्राणघातक हल्ले करून खेळु नका. मुंबई महापालिकेच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी जनतेला आवाहन केले की, समाज प्रतिनिधी यांनी समोर येऊन मदत करावी कारण आज माझ्या नर्से आणि डॉक्टर थकलेले आहेत! खरंच सर आम्हाला आणि डॉक्टरांना आपला अभिमान आहे की आपण कोवीड टास्क फोर्स प्रमुख आहात भावनेपोटी किंवा आपलेपणा पोटी डॉक्टरच्या हि आधी तुम्ही माझ्या नर्सेस असं संबोधून परिचारिका प्रति असलेला आदर आणि आपलेपणा उभ्या महाराष्ट्राने पहिला आहे. आणि हिच खरी आमच्या कामाची पोच पावती आहे.. ही गोष्ट आम्हाला अभिमानाची आहे.

या महामारीत मी आणि माझ्यासारख्या लाखो करोडो नर्सेस गेल्या वर्षभरापासून अविरत काम करत आहेत .कोणाला स्वतःला संसर्ग झाला, कोणीही आपल्या घरातील परिवारातील मित्र परिवारातील कित्येकांना गमावला आणि नर्स(११६) आणि डॉक्टर(१७४) ह्या महामारीत आपले प्राण ही गमावले.पण तुम्हाला या तमाम मुंबई महापालिकेच्या नर्सेस कडून शब्द आहे सर, “आम्ही शरीराने जरी थकलो तरी आम्ही मनाने न थकता अविरत जोपर्यंत आपण या महामारी वर विजय नाही मिळवत तोपर्यंत काम करू आणि तुम्हाला सदैव व पाठिंबा देऊ.” सर तुम्ही प्रेमाने पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा हा पूर्ण महापालीकेचा परिचारिका वर्ग सदैव आपल्या पाठीशी राहील.या आर्टिकलच्या अंती एक कोव्हिड योद्धा म्हणून किंवा फ्रंट लाईन वॉरियर म्हणून मी जनतेला एकच आवाहन करेल की या परिस्थितीत आपल्याला सर्वांना सावरायचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांना खालील काही गोष्टींचे पालन करायला हवे.. १)घाबरून जाऊ नका २) कोरोनाची सौम्य लक्षणे असतील तर घरातच उपचाराला प्राधान्य द्या जेणेकरून गरजू रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होतील. ३)इतर किरकोळ आजारांच्या रुग्णांनी रुग्णालयात गर्दी करू नका ४) त्रिसूत्री म्हणजेच, सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स यांचा वापर करा.५) गरज असेल तरच घराबाहेर पडा.६) हाफ नॉलेज इज डेंजरस कृपया कोरोना रिलेटेड काहीही अफवा पसरू नका किंबहुना काही माहिती मिळाली तरी त्याचं पूर्ण नॉलेज घेऊन मग ती माहिती खरी आहे किंवा खोटी आहे हे तपासूनच पुढे फॉरवर्ड करा.७) तज्ञ डॉक्टरांचे व्हिडिओस बघुन माहिती मिळवा, पण मिळालेली माहिती खोटी आहे की खरीहे तपासून पाहिल्यानंतरच इतरांना ते फॉरवर्ड करा,अवेअरनेस च्या नावाखाली चुकीची पसरवू नका. ८) आयसीएमआर किंवा डब्ल्यू एच ओ च्या गाईडलाईन्स नक्की फॉलो करा.९)आणि कृपया स्वतः घाबरू नका आणि इतरांनाही घाबरवू नका.सप्रेड पॉझिटिव्हिटी टू गेट हंड्रेड पर्सेंट नॅशनल रिकवरी रेट
जय हिंद जय महाराष्ट्र

✒️लेखिका:-भाग्यश्री सानप 9082863640
के.ई.एम,हॉस्पिटल परिचारिका मुंबई