आजची कामगार चळवळ आणि आंबेडकरी आंदोलन

21

महाराष्ट्र दिन‌ व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेती आणि कामगार हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो.ईथली अर्थव्यवस्था अर्थकारण कामगाराच्या श्रमिकांच्या श्रमावंर अवलंबून आहे.म्हणुन प्रथम कामगाराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले पाहिजे.त्याच जिवनमान उंचावल पाहिजे.आज कामगार दिन साजरा करताना कामगार त्यांचे प्रश्न यांवर चर्चा होणं गरजेचं आहे.

*कामगार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर*

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा कामगार कष्टकरी यांच्या बाजूने होता.कामगाराच्या हिताचा होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव कामगार नेते होते . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे कामगार यांचे कामांचे बारा तास वरुन आठ तास झाले.पी एफ योजना सर्व कामगारांना लागु झाली
आठवडी सुट्टी सर्वांना सक्तीची केली.महिलांना भरपगारी प्रसुती सुट्टी.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जिवनभर कामगार, कष्टकऱ्यांच्या विकासासाठी संघर्ष केला.

*आज कामगार दिन आणि कामगार प्रश्न*
आज आपण कामगार दिन साजरा करत असताना कामगारांचं जिवनमान उंचावल आहे का हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.आज कामगाराचे अनेक गंभीर प्रश्न आहेत.कामगाराच्या आरोग्याचा प्रश्न, कामगाराच्या निवारा प्रश्न, कामगाराच्या मुलांच्या शिक्षणाचं प्रमाण, ऊसतोड मजुरांचा प्रश्न,विटभट्टी कामगार प्रश्न, सर्व क्षेत्रात कामगार यांची होणारी आर्थिक पिळवणूक असे अनेक कामगारांचे गंभीर प्रश्न आहेत.

*कामगार अर्थव्यवस्थेचा कणा*
म्हणजे खाजगी कारखाने असतील ,सरकारी कारखाने असतील , बांधकाम क्षेत्र असेल ,क्षेत्र कोणतेही असो सर्व अर्थव्यवस्था ही कामगाराच्या श्रमावर अवलंबून आहे.म्हणजे कामगार अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

*कामगार संघटना आंबेडकरी चळवळ*

आज आपल्या देशात करोडो कामगार आहेत औद्योगिक कंपनीत काम करणारे कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार, ऊसतोड कामगार,विटभटी कामगार, किंवा विविध क्षेत्रातील कामगार,मुळात कामगार संघटीत नाही त्यामुळे त्याची पिळवणूक होते.आज लाखो करोडो कामगार आहेत पण संघटीत नाहीत.कामगाराच्या कल्याणासाठी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार सर्वांना सोबत घेऊन चालणार कामगार संघटन निर्माण झाले पाहिजे ‌.सर्वच क्षेत्रातील कामगार क्रांतीबा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या संघटनेत संघटीत झाले तर त्यांची पिळवणूक होणार नाही. जर कामगार संघटीत झाला तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही.आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामगारांचं नेतृत्व कामगारातुन निर्माण झाले पाहिजे.ज्याला कामगाराच्या प्रश्नांची जाणीव आहे कामगाराबद्दल आपुलकी आहे.तेच कामगार नेतृत्व म्हणून पुढं आलं पाहिजे.आपण कामगाराच्या प्रश्नांची चर्चा करत असताना आजही कामगार प्रश्न सुटले नाहीत.कामगाराच जिवनमान उंचावल नाही.कामगाराच्या कामातुन श्रमातुन उंच उंच इमारती निर्माण झाल्या परंतु आजही कामगार झोपडपट्टीत राहात आहे.जर कामगारांना त्यांच जिवनमान उंचावून जगायचं असेल तर त्यांनी संघटीत होऊन काम केलं पाहिजे.तरच कामगारांचा सर्वांगीण विकास होईल.कामगार संघटीत होताना क्रांतीबा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या संघटनेत संघटीत झाले पाहिजे

‌‌ ✒️लेखक:- सुनिल प्रधान