रहिनपुरे येथील गॅस सिलिंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झालेल्या परिवाराला पीआय दुर्गेश तिवारी यांच्याकडून किराणा साहित्य भेट

27

🔹पोलीस अधिकारीचे कर्तव्य बजावत असताना पीआय दुर्गेश तिवारींनी जोपासली माणुसकी

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.3मे):-रहिनपुरे ता. शिंदखेडा येथील शेतकरी विश्वास पाटील व निंबा पाटील यांच्या घराला दि. 29 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती.

यात विश्वास पाटील व निंबा पाटील यांच्या घरे पूर्ण पणे जळुन खाक झाली होती. यात पूर्ण संस्कार उपयोगी सामानाची राखरांगोळी झाल्याने हे दोघे परिवार आजच उघड्यावर आले आहे. ही परस्थिती लक्षात घेत दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी माणूसकी जोपासत त्यांच्याकडून महिनाभर पुरेल इतका किराणा साहित्य भेट देऊन त्या परिवाराचे सांत्वन करून आधार दिला आहे.

पोलीस अधिकारीचे कर्तव्य बजावत असतानाच पीआय तिवारींनी जोपासलेली माणुसकीचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, वाहन चालक संजय गुजराथी, पोलीस पाटील राजेश बेडसे, माजी सरपंच दिनेश बेडसे, मनोहर पाटील, नकुल पाटील, विश्वास पाटील, निंबा पाटील, चंद्रकांत पाटील मुकेश पाटील, उखा पाटील आदी उपस्थित होते.