शासनाच्या नाकर्तेपणामुळे आदिवासी समाज खावटी योजनेपासुन वंचित

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.3मे):-राज्य शासनाच्या दी.९सप्टेंबर
२०२०रोजी आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासन निर्णयानुसार राज्यातील अनुसूचित जमातीमधील अतिमागास जमातीसह परितक्त्या ,विधवा तसेच दारीद्र रेषेखालील आदी लाभार्थ्यांना खावटी वाटपाचे निर्देश दिले. मात्र शासनाच्या नाकर्तेपणामुळे तब्बल एक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना जाणीवपुर्वक खावटी योजने पासून वंचित ठेवले आहे आसा आरोप भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ.आरतीताई फुपाटे यांनी केला आहे.

आदिवासी विकास विभागाने काढलेल्या निर्णयानुसार आदिवासी लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ४ हजार रुपये खावटीचा लाभ देणे अपेक्षित होते. त्यामध्ये २ हजार रुपये बँक खात्यात तर उर्वरित २ हजाराचे साहित्य वाटप नमूद आहे.१२ साहित्यांचा त्यात उल्लेख आहे मात्र अशा प्रकारच्या खावटी वाटप हा आदिवासी समाजातील दिशाभूल करणारा वाटप आहे त्यामुळे डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात ४ हजाराचे खावटी अनुदान जमा करण्यात यावे अशी मागणी केली. त्याचबरोबर आदिवासी लाभार्थ्यांना शासन निर्णयातील मुद्दा क्र.५ नुसार १२ साहित्य ज्यामध्ये मटकी, चवळी, हरभरा, वटाणा , उडीद , दाळ , तुरदाळ , साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मिठ , चहापत्ती आदी वस्तू देण्याचा उल्लेख आहे.

त्याऐवजी शासनाने अशा वस्तूची खरेदी ऐच्छिक स्वरूपात ठेवावी अशी मागणी केली आहे. लाभार्थ्यांना कुठल्याही साहित्य खरेदीची बंधने ठेवू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर आदिवासींना निरक्षर समजण्याचा प्रकार शासन निर्णयात घडल्याचे नमूद करून आदिवासींना निरक्षर समजू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.त्यामुळे या खावटी योजनेचा राज्य सरकारने तात्काळ वाटप करावा अन्यथा भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, व माजी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या आदेशान्वये पुसद येथे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच उपविभागीय आधिकाऱी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉ. आरतीताई फुपाटे,
भाजप जिल्हा अध्यक्ष विश्वास भवरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सिडाम,पल्लवी देशमुख, भाजपा पुसद शहरअध्यक्ष दीपक परिहार, योगेश राजे, कल्पना वाघमारे अदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED