“गाव तिथे शाखा आणि घर तिथे भिमसैनिक” ही संकल्पना राज्यभर राबविनार – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ. घनःशाम भोसले

30

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.3मे):-दलित पँथर च्या समस्त पदाधिकारी यांनी आपल्याआपल्या क्षेत्रातील संघटनेअंतर्गत येणाऱ्या समस्या,रिक्तपद तसेच आवश्यक असणारे संघटनेच्या माध्यमातून सहकार्य आणि आवश्यक अशा सुचना मांडल्या व त्यासंदर्भात उपस्थित केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या उपस्थित पदाधिकारी यांनीही पदाधिकारी यांच्या समस्या समजून घेवून संघटना वाढीच्या दृष्टीने प्राधान्याने प्रयत्न करणार तसेच महाराष्ट्र राज्यात जिथे जिथे दलित पँथर ची शाखा नाही.

तिथे तिथे प्रत्येक गावा गावात दलित पँथर या संघटनेची शाखा काढून प्रत्येक घरा घरात भिमसैनिक ही संकल्पना कार्यकर्त्यानी पुर्ण ताकदीने हाती घ्यावी असे आवाहन दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत दलित पँथरचे केंद्रीय तसेच राज्य कार्यकारणीतील समस्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.