गंगाखेडच्या कोरोना केंद्रात जनरेटर सुरू !

🔸प्रशासनाची मेहनत; यादव यांचा पाठपुरावा

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3मे):-येथील कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात जनरेटर कार्यान्वीत करण्यात आला आहे. नगर परिषद आणि विज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेत जनरेटर सेवा युद्धपातळीवर सुरू केल्यामुळे रूग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे जनरेटर सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा करणारे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

गंगाखेड येथील कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात हजारावर रूग्ण ऊपचार घेवून बरे झाले आहेत. तर सध्या येथे जवळपास ७० रूग्णांवर ऊपचार केले जात आहेत. तांत्रिक बिघाड होवून वायरींग जळाल्यामुळे येथील विजपुरवठा दोन दिवस खंडीत झाला होता. याचा मोठा त्रास रूग्णांना सहन करावा लागला. येथील विजपुरवठा सुरळीत झाला तरी येथे जनरेटर सुविधेची आवश्यकता होती. तशी मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी पालकमंत्री नवाब मलीक, आ. सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर यांचेकडे केली होती. तसेच गंगाखेडचे ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, न. प. चे विज अभियंता प्रसाद माळी यांचेकडेही यासाठी पाठपुरावा केला होता.

महावितरणचे शहर अभियंता नितेश भसारकर, न. प. चे प्रसाद माळी, लाईनमन राम पुप्पलवाड, कृष्णा नरवाडे आदिंनी मागील दोन दिवस युद्धपातळीवर काम करत येथील जनरेटर सेवा कार्यान्वीत केली. यामुळे आता या कोविड केंद्रात रूग्णांना २४ तास अखंड विज मिळणार आहे. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे यांनी आज कोविड केंद्रातील जनरेटर कक्षास भेट देवून पाहणी केली. प्रभारी डॉ. सुनिल कुगणे, डॉ. रीता बारहाते यांनी या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. येथे आवश्यक त्या सुविधा ऊपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी यादव, बोबडे यांनी सांगीतले. पत्रकार महालिंग भीसे, सुनिल कोनार्डे यांची यावेळी ऊपस्थिती होती.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED