कालच्या चक्रीवादळाने घेतला चिमुकल्याचा बळी

27

🔹तब्बल शंभर फूट उंच उडाला चिमुकल्या बाळाचा पाळणा

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

आर्णी(दि.3मे):- तालुक्यातील मौजा लोणी येथील एक तारखेला दुपारी बारा वाजताच्या सुमारास अचानक चक्रीवादळ सुरु झाल्यामुळे ह्या वादळा सिमाच पार केली होती की इतके भयानक होते की लोणी येथील सुनील राऊत यांच्या टिन असलेल्या घरात घुसले घराच्या वर लोखंडी अँगल व टीनाचे छप्पर होते व त्या अँगल ला दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाळणा बांधलेला होता.

तो बाळ निद्रा अवस्थेत होते चक्रीवादळाने राक्षसी रूप धारण करून घरावरील टीनाचे छप्पर पाळण्यासहित तब्बल शंभर फूट उंच हवेत फिरविले आणि खाली कोसळले यात दीड वर्षाच्या बाळाला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यास तात्काळ यवतमाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले मृत्युक बाळ सुनील राऊत असे निष्पाप मृतक बालकांचे नाव होते, या घटनेने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.व बाळा बदल हळहळ करीत क्रोध गावकऱ्यानी फोडला,यालाच म्हणतात काळाची झडप तो मायचा जिव्हाळा काळानी हिसकावला। ~~~~~~~~~~~~~~~~~~