जाम येथील ‘स्वास हॉस्पिटल’ मध्ये कोविड सेंटरची परवानगी द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

27

🔹माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांची मागणी

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.३मे):-जाम तालुका समुद्रपूर येथे ‘स्वास हॉस्पिटल’ मध्ये कोविड सेंटरची परवानगी देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी वर्धा ,निवासी जिल्हाधिकारी तथा मु. का. अ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले असून अमरावती ,वर्धा जिल्ह्यातील कोविड सेंटर मध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नाही त्यामुळे कोविड रुग्णांची हेळसांड होत असून मरण्याचे प्रमाण वाढत आहे.

त्यामुळे भविष्याचा वेध लक्षात घेता जाम ता. समुद्रपूर येथे डॉ.पराते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वास हॉस्पिटलची नवीन सुसज्ज वास्तू निर्माण केली आहे.स्वास हॉस्पिटल मध्ये डॉक्टर,नर्सेस, ऑक्सिजन व इतर मानवीय सर्व सेवा उपलब्ध आहेत.

जाम हे नागपूर चंद्रपूर हायवेवर मध्यभागी आहे हिंगणघाट, समुद्रपुर ,वरोरा, चिमूर,उमरेड इत्यादी तालुक्यांचा परिसर जामला लागून आहे.तरी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा भविष्याचा वेध लक्षात घेता जाम येथील स्वास हॉस्पिटलला कोविड सेंटरची परवानगी द्यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार , जिल्हाधिकारी वर्धा, निवासी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना केली आहे.