राजापूर शिवारात तरुणाचा मृतदेह घातपाताचा संशयचा पर्दाफाश

🔺दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

✒️आतिख शेख,तलवाडा प्रतिनिधी

तलवाडा(दि.3मे):-पोलिस ठाण्यांतर्गत राजापुर शिवारात एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह दि. 1/5/2021 रोजी शानिवारी आढळला होता. मयताच्या तोंडावर माराच्या व गळ्यावर आवळल्याच्या खुणा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.गोळेगांव ता.गेवराई येथे भटक्या गोसावी समाजाचे काही कुटुंब पाल ठोकुन वास्तव्य करतात. त्यातीलच ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण वय ३५ वर्षे हा तरुण कुटुंबासह राहतो. त्याचा मृतदेह राजापुर शिवारातील एका शेतात आढळुन आला होता. त्याच्या चेहर्‍यावर जखमा व गळ्याला आवळल्याची खुण आढळल्या होत्या. त्यामुळे हा खूनाचा प्रकार असल्याची माहिती कळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी या घटनेचा जोरदार तपास लावून शोध सुरू केला.

तलवाडा पोलीसांनी अवघ्या चोवीस तास झडा लावला आहे. राजापूर शिवारात मृतदेहच आढळला असुन त्याचा खून झाल्याचा आरोप आई व पत्नीने केला होता. त्यानुसार या घटनेचा तपास केल्यानंतर हा तपास लागला. या घटनेची माहीती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी कर्मचारी पोलीस कृष्णा वडकर, रामेश्वर खंडागळे, खाडे, व राऊत, पोलीस वाहान चालक बागलाने, यांच्यासह घटनास्थळी जावुन पाहणी करत पंचनामा केला होता. मयताचे नातेवाईक यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी नाना अप्पा शिंदे वय १९ रा गोळेगाव व एक महिला आहे.

अज्ञात कारणावरून गळा आवळून खून केला आहे पुढील तपास तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने तपास करीत आहे. या यशस्वी तपासाबद्दल त्यांचे जनतेमधून अभिनंदन होत आहे.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED