बदलते राजतरंग

“स्वातंत्र्य हा व्यक्तिच्या आयुष्याचा अत्यंत मौलिक भाग असला तरी ,खरे स्वातंत्र्य कशात आहे हे कळले नाही तर माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकणार नाही.स्वतःबरोबर इतरांचे स्वातंत्र्य जपण्यातच खरे स्वातंत्र्य आहे.यामुळे सामाजिक जीवनातील संदिग्धता दूर होईल.”
-सिमॉन द बोव्हार

नुकत्याच प.बंगाल , तामिळनाडू,पॉडेचरी,आसाम व केरळ या राज्यातील विधानसेभेची निवडणूक पार पडली .या निवडणूकिचे निकाल लागले असून या निकालांनी एक्झिट पोलला एक्झिट केले.निवडणूकपूर्व सर्वेक्षण हे काही कामाचे ठरले नाही.यामध्ये कितीतरी पैसा बरबाद होतो.टिव्हीवर चर्चा होते पण निकालानंतर याचा काही उपयोग होत नाही म्हणून निवडणूक आयोगाने असे एक्झिट पोल बंद करावे.या निवडणूकित आचार संहिता व कोरोना नियमांचे सर्रांस उल्लंगण करण्यात आले.ज्या नेत्यावर कोरोना महामारी थांबण्याची जबाबदारी होती तेच नेते नियमांची पायमल्ली करीत होते.निकालानंतर राजकारणाचे बदलते राजतरंग भारतीय नागरिकांना पाहायला मिळत आहेत . लोकशाही व्यवस्थेतील एक महत्वाचा भाग म्हणजे निवडणूक आयोग होय.पण या आयोगाची विश्वसनियता दिवसेंदिवस घसरत चालली आहे.संविधानिक अधिकार विसरून राजकारण्याच्या हातचे बाहूले होत आहे हे भारतीय लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे.

कोरोनाच्या सावटाखाली निवडणूक पार पाडल्या पण कोरोना बांधिताची संख्या मोठी वाढत असल्याने या राज्यांची मोठी हानी होऊ शकते.मतदारांनी आपले सैंवधानिक कर्तव्य पार पाडले.आता नेत्यांनी आपले सैंवधानिक कर्तव्य पार पाडावे .आपले स्वातंत्र्य हे आपले खरे हत्यार आहे यातूनत बदलते राजतरंग यांना चाप देऊ शकतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,”मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे.ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिंवत असून मेला आहे.मनाचे स्वातंत्र्य जींवतपणाची साक्ष आहे.जो बुध्दी जागृत ठेवून आपले हक्क काय ,आपले अधिकार काय,आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो याला मी स्वातंत्र्य म्हणतो.”असा माणूस देशात आज दिसतो का हा नक्कीच प्रश्न मला पडला आहे.

या निवडणूकितून केंद्र सरकारचं जे इगित होत ते पूर्ण झालं आहे.इव्हिएम च्या करीशम्याने भारतीय राजकारणातील सत्यनिष्ठ निवडणूका इतिहास जमा झाल्या आहेत.इतर राजकिय पक्ष आनंद उत्सव साजरा करत असतांना लोकशाही व्यवस्था कशी विकलांग होत आहे हे त्यांना दिसत नाही. भारतीय लोकशाही अखरेचा श्वास घेत आहे.सरकारने तीला केव्हाच आयसीयू मध्ये बंदिस्त केला आहे.ऑक्सिजनच्या अभावाने तीचा जीव गुदमरत आहे.भारतात मूत्युचे भयचक्र असतांना नवे बदलते राजतरंग वेल्हाळत मनशोक्त आनंद साजरा करत आहेत.
काही काळात नंतर भारतीय संविधान व्यवस्था समाप्त करून भांडवलदारी व उच्चवर्णीय लोकांची नवी राज्यव्यवस्था निर्माण केली जाईल.वर्तमानाचा खदखदत असणारा लाव्हा दोन हजार चोविसला कसा पेट घेतो यावर भारतीय लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असले.जोपर्यंत इव्हिएम वर मतदान होईल तोपर्यंत पारदर्शक व स्वतंत्र निवडणूक होणार नाही.यासाठी बँलेट पेपरवर निवडणूका घेण्यासाठी जन आंदोलन करावे लागेल.

आंतोनियो ग्राम्शी हा राजकिय विचारवंत म्हणतो की,”धुरीणत्वाच्या माध्यमातून राजसंस्था व भांडवलशाही आपले स्थान अधिक बळावर निर्माण करतात .या धुरीणत्वाला हरवायचं असेल तर प्रतिधुरीत्वाची निर्मिती करावी लागले.स्थानयुध्द व डावपेच्याचे युध्द या मार्गातून कामगार वर्गातूनच प्रतिधुरीत्व निर्माण व्हायला हवे.”या भूमिकेतून भारतीय राजकारणातील दिशा बदलली जाईल अशी आशा आहे.
आज देशातले राजकिय , सामाजिक,धार्मिक वातावरण एेवढे गढूळ झाले आहे की ते स्वच्छ करायला कित्येक वर्षे काम करावे लागेल.अंधभक्तगणाच्या निर्मितीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवले जात आहे.अंहकारी निरकुंश राजतंत्र अराजकता निर्माण करत आहे.नागरिकांना हाशियावर सोडून फक्त स्वःहिताचे नवे राजतरंग फोफावले आहेत.क्रांतीविहिन क्रांती होत असल्याने सामुदायीक लोकजीवन विकलांग होत आहे.कोविड -१९ या महामारीला आटोक्यात आणण्यापेक्षा ती कशी वाढत जाईल यांचेच राजतरंग देशात तयार केले जात आहे.देशातील बुध्दिवंत माणसे सरकारच्या गळाला लागले आहेत.खोटी बोलण्याचा स्पर्धा वाढली आहे.

माजी सरन्यायाधीस चूकिचे वाक्य लोकांना सांगत आहेत.तर कुणी स्वातंत्र्य संग्रामातील खोटे दाखले देत आहेत.अशा कंपूपासून भारतीयांनी सजक राहावे.सत्यनिष्ठेची शपथ घेऊन असत्य बोलत जाण्याची प्रक्रिया देशात मोठ्या वेगाने सुरू आहे.काही बुध्दिवंत माणसे सरकार न घाबरता आपले रोखठोक विचार लोकांनसमोर मांडत आहेत.न्यायाची व संविधानाची ऊर्जा घेऊन रणांगणावर उतरली आहेत .हीच माणसे देशाला वाचवू शकतात.सेंद्रिय बुध्दिवंतच सर्जनशील सेंद्रिय समाजाची निर्मिती करू शकतात.कारण तेच प्रत्येक तळागाळात जाऊन काम करत असतात.आज निवडणूकीत विजयी पक्ष आनंदाने नाचत आहेत .पण कोरोना संकटाचा सामना ते कसे करणार यावर त्याचे यश अवलंबून राहिल.अवैज्ञानिक नेत्यांनी अकलेचे कांदे सोलत न राहता नव्या वैैज्ञानिक सिध्दांताने ही महामारी दूर करावी.

जिंकलेल्या पक्षाने काहीतरी नवीन करून दाखवावे. नाहीतर मृगजळाचे बांधकाम करायला काही पक्ष टपून बसले आहेत.भविष्यकाळाच्या उदरात नवे बदलते राजतरंग डावपेच आखत सारा लोकशाही खांब जमीनदोस्त करू शकतात.आतातरी लोकशाही मूल्ये जगणाऱ्या तिसऱ्या विचारपक्षांनी नवी आघाडी करून दोन हजार चोविसची लोकसभा काबीज करावी.स्वातंत्र्य,समता,बंधुभाव व न्याय यावर आधारीत आपली लोकशाही जींवत ठेवावी.नवा प्रतिधुरीत्व निर्माण करून धुरीणत्वाला धुळ चारुन भारताचे भविष्य उज्ज्वल करावे .हाच एकमेव चांगला मार्ग आहे.दुसरा कोणताच मार्ग चांगला नाही.तूर्ताश थांबतो..!

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

नागपूर, महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED