हा भारत देश आहे ! हिंदू राष्ट्र नाही !

भारत देश विविधतेने भरलेला आहे आणि विविधता भारताचा आत्मा आहे.भारत भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे.या विविधतेला नष्ट करणारे स्वतःच नष्ट होतात.भारत देश हा मुळात एकाधिकारशाहीच्या विरोधात उभा राहिलेला काळविजयी कालखंड आहे. वेळोवेळी भारतावर अल्प विकारींनी राज्य केले, परंतु अखेरीस विजय “विचारांचा” झाला.असत्याचा पराजय झाला आणि सत्य जिंकले, म्हणून “सत्यमेव जयते” हे भारताचे प्रशासकीय सूत्र आहे.

हे सत्य आता भारतातील तीन कोटींची गर्दी असलेल्या संघपरिवाराला समजणे आवश्यक आहे.त्यांनी भारताला हिंदुराष्ट्र करण्याऐवजी भारताच्या विविधतेला स्विकारण्याची आवश्यकता आहे.आधुनिकवादाच्या विकारांच्या आड, शिक्षित होणाऱ्या भारताच्या आर्थिक समृद्धीवर लागलेले ग्रहण म्हणून उदयास आलेल्या विकारी संघाने,हिंदू मुसलमान फूट पाडून बहुमताची हिंदू सरकार तर स्थापन केली, परंतु मुसलमानांना ठिकाणी लावण्या ऐवजी हिंदूंनाच ठिकाण्याला लावले.

आज परिस्थिती अशी आहे की ना स्मशानभूमित जागा मिळतेय, ना कब्रस्तानात आश्रय मिळतो आहे.संपूर्ण देशात मृत्यूचे तांडव आहे आणि हिंदुराष्ट्राची चिता जळत आहे. मंदिरं-मशिदींऐवजी जीव वाचवण्यासाठी लोकं नेहरूंनी निर्माण केलेल्या रुग्णालयांत शरण जात आहेत. परंतु त्यांचे दुर्दैव हे आहे की, रुग्णालयात जागा नाही, बेड नाही, ऑक्सीजन नाही. बहुधा हा निसर्गाचा न्याय असावा की, जे लोक मंदिर निर्माणासाठी दान करतात त्यांना रुग्णालयाची काय गरज ? त्यांनी मंदिरातील विभूति लावुन आपले प्राण वाचवावेत.

विकारी संघाने वर्षानुवर्षे विकाराचे पालनपोषण केले, त्याला प्रोत्साहन दिले व प्रसारित केले.त्यासाठी प्रचारक तयार केले. धर्म, संस्कृती, संस्कारांच्या आड हा विकारी संघ खोटे नायक आणि प्रतिमा तयार करतो व त्यांचा प्रचार – प्रसार करतो.मुळात या विकारी संघाचा प्रकृति आणि मनुष्यावर विश्वास नाही. हे एक काल्पनिक अवतार जन्माला घालतात व्यक्तीच्या आस्थेला राष्ट्राची अस्मिता बनवून संपूर्ण जन समुदायाला एका मृगजळात खोल अंधकारात ढकलून देतात. विना तथ्याचे, पुराव्याचे एक एक मिथ्य घडवतात. त्या मिथकांना सामान्य जीवनात उपस्थित असलेल्या मिथकांशी अशा प्रकारे झोल करून जोडतात की,सामान्य लोकांमध्ये हा विकार महामारीच्या स्वरूपात दिसतो.त्याच महामारीचा परिणाम असा की संविधान सम्मत भारतीय भारतीयता सोडून गर्वाने “हिंदू” असण्याच्या घोषणा देतात.”जय श्री राम” या उद्घघोषणांनी मर्यादा पुरुषोत्तम रामाची अस्मिता छिन्न विच्छिन्न करणारे , विकारी गिधाडाला भारताची सत्ता सोपवतात.बहुमताची हिंदू सरकार निवडून देणारे आज स्वत: अस्थिंच्या रुपात परतत आहेत. मरणासन्न लोकांना वाचविण्याऐवजी विकारी संघ आणि त्याची गिधाडे जळत्या चितांमध्ये निवडणूकीच्या रॅल्या काढत आहेत.

भारताने आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या उष्मेमध्ये तापवून संविधान घडवले. त्याचा स्पष्ट हेतू असा आहे की मनुस्मृती, कुराण किंवा कोणताही धार्मिक ग्रंथाने भारताचे प्रशासन संचालित होणार नाही.भारतीय संविधान प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक जीवनात त्यांच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देते पण सरकारी कामकाजात धर्माचा हस्तक्षेप नाकारते. म्हणून सर्वांनी हे लक्षात घ्यावे की, धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे. भारतीय संविधान हे भारताच्या स्वातंत्र्याची ओळख आहे.म्हणून, विकारी संघाच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदू आणि मुस्लिमानांनी हे वेळीच समजा की, माणूस म्हणून जगायचे आहे, स्वतंत्र देशात राहायचे आहे तर त्याचे एकमात्र सूत्र आहे “भारतीय होऊन भारतात राहणे” आणि भारतीय बनून देशाची सरकार निवडणे. हिंदू-मुस्लिम होऊन सरकार निवडल्यास, आपण अशाच प्रकारे मरू,आपल्याला रुग्णालयात बेड मिळणार नाही, स्मशानभूमीत जागा मिळणार नाही किंवा कब्रस्तानात आश्रय मिळणार नाही!

म्हणून, हे भारतीयांनो, आता हिंदुराष्ट्राच्या विध्वंसक षड्यंत्राला तोडा, विकारी संघाचा धर्म, संस्कृती आणि संस्कारांचा ढोंगीपणा नाकारा. विचाराने, बुद्धीने आणि संविधानाने देशाचे पुनर्निर्माण करा. फसवणूकीने जीवन नाही तर फक्त मृत्यू होतो. आपण स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचला आहे, तो राजकीय गुलामगिरीतून मुक्ततेचा दस्तावेज आहे. चला, आपण सर्वांनी संविधानाच्या प्रकाशात विकारमुक्त आणि विचारयुक्त भारताचा इतिहास निर्माण करूया!

✒️लेखक:-मंजूल भारद्वाज(रंगचिंतक आणि तत्वज्ञ)

(लेखक राजनैतिक विचारवंत आहेत)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED