कडक लॉक डाऊन मध्ये पुसेगाव पोलिसांची कडक कारवाई

21

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

सातारा(दि.4मे):-जिल्ह्यातील जागतिक महामारी कोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन चे आदेश जाहीर केलेनंतर पुसेगाव येथे नाकाबंदी करून विनाकारण फिरणारे 19 लोकांच्या मोटार सायकल जप्त करून पोलीस ठाणेत लावणेत आलेल्या आहेत. तसेच विनामास्क फिरणारे 6 लोकांच्यावर कारवाई करनेत आली असून.

पुसेगाव येथील राजेश ट्रेडर्स .राजेश शहा यांच्या किराणा दुकानावर लाॕकडाऊन आदेशाचा वारंवार भंग केले बाबत -पुसेगाव तलाठी,पुसेगांव ग्रामपंचायत ,व पुसेगाव पोलिस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केली 1000दंड व 10/5/2021पर्यत दुकान सिल केले आहे.सदर कारवाई सपोनि. मछले,पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.