खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील

31

मरावे पण कीर्ती रुपी राहावे!.” असे काही महामानव संत महात्मा झाले आहेत ते आज आपल्यात शरीराने नाहीत पण कार्याने अजरा अमर आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक म्हणून प्रसिद्ध होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापना केली होती. कर्मवीर भाऊरावांनी मागासवर्गीय समाजातील व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले होते.त्या तोडीचे काम आज एकाही माणसांचे नाही.राजकीय नेत्यांनी खूप शाळा कॉलेज काढल्या पण त्यांचा मुख्य उदेश आणि उधिस्ट शिक्षण प्रसार नाही तर कायमस्वरूपी उत्पनाचे साधन म्हणजे पैसा कमविणे हा आहे.त्यामुळेच ते पैसे कमविणारे शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जातात.खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील होते, आणि आज ही आहेत.
भाऊराव पायगौडा पाटील यांचे पूर्वज कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुदबीद्री गांव होते.त्यांचा जन्म २२ सप्टेंबर, १८८७ जन्म कुंभोज जिल्हा कोल्हापूर येथे झाला होता.त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी, विटा सांगली जिल्ह्यात झाले त्यांचे वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे सतत बदल्या होत असत.

त्यामुळे भाऊरावांन जैन बोर्डिंग कोल्हापूर येथे राहण्याची व्यवस्था केली होती.तिथेच त्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि राहण्याच्या गैरसोयीची समस्या गंभीर वाटली ती कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्यांनी मनावर घेतले आणि पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट त्याग करून जिद्दीने शिक्षण संस्थेच्या ७२ वर्षात वृटवृक्ष निर्माण केला.तो आज ही सर्व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांनां प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या ६२ व्या स्मृतिदिनी (मृत्यूची तारीख ९ मे,१९५९ मृत्यूस्थळ पुणे) त्यांच्या संस्थेला भेट देऊन अभ्यास करून लिहलेला लेखप्रपंच
मूक मराठ्यांचे लाखोंचे बोलके शिस्तबद्ध मोर्चांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातूनच नवीन तरुण तडपदार नेतृत्व पुढे येईल अशी अपेक्षा होती. पण ती स्पेशल अयशस्वी झाली. कारण त्याचा खरा शत्रू कोण हे त्यांना अजूनही माहिती नाही.कोपर्डी व अट्रॉसिटी हे दोन महत्वाचे मुद्धे समाजात त्यांनी ज्या प्रमाणे प्रबोधन केले होते. त्यातुन प्रचंड दरीच निर्माण होणार होती,पण आंबेडकरी चळवळीतील जागृत नेत्यांनी सावधगिरी घेतल्यामुळे ती फारशी निर्माण झाली नाही. यात बिलकुल शंका नाही. कारण आजच्या मराठ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज किंवा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख पण नाही.

कारण त्यांनी शिक्षण संस्था काढतांना कोणते स्वप्न पाहिले होते.आणि गेल्या पंचवीस वर्षातील मराठा समाजातील आमदार,खासदार मंत्री यांच्या शिक्षण संस्था पाहिल्यास त्यांचे आणि यांचे उद्देष्ट समोर येतात. त्यातून मराठा आरक्षणाची गरज आणि महत्व सूर्यप्रकाशा सारखे दिसते.आज जगात शिक्षण देणाऱ्या संस्था खुप आहेत.आणि त्या संस्थाचे उदिष्ट पैसा कमविणे हाच असतो. ह्या सर्व खाजगी कंपन्या झाल्या आहेत. सुजाण नागरिक घडविणे आणि देशाचा विकास करण्याचा उदेश या शिक्षण संस्थाच्या संचालकाचा नाही.विद्यार्थी दसे पासूनच जर विद्यार्थांना प्रवेश घेताना भष्ट्राचार करून शिक्षण घ्यावा लागत असेल तर पुढे त्यानी कोणत्याही पदव्या घेतल्या तर त्याचा उदेश फक्त पैसा कमविणे हाच असणार आहे.त्यांना देशाच्या विकासाशी कोणते ही देणेघेणे नाही.आणि आज सर्वत्र हे चित्र दिसत आहे.

दिनाक ४ ऑक्टोबर १९१९ ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. त्यावेळी १९१९ ला त्यांचे उदिष्ट लक्षवेधी होते. १) शैक्षणिक दुष्ट्या गोरगरीब मागासवर्गीय समाजात शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि ते वाढविण्यास मदत करणे.२) मागासलेल्या समाजात गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.३) निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांत बंधुभाव निर्माण करणे. ४) अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे. ५) संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे. ६) सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे. ७) बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.असे शिक्षण देणारे संस्था संचालक शोधून ही सापडणार नाहीत..रयत शिक्षण संस्था ही भी आज सत्यशोधक महात्मा फुलेच्या वैचारिक वारसदार भाऊराव पाटील यांच्या धेय्य धोरणा नुसार चालत नाही या संस्थेत पूर्ण चातुर्वर्ण आणि गर्वसे कहोचा चा बोलबाला आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील जन्म २२ सप्टेंबर १८८७, कुंभोज,जिल्हा कोल्हापूर,महाराष्ट्र येथे झाला.ते मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला होता. लहानपणा पासूनच भाऊराव बंडखोर वृत्तीचे होते. अन्याय अत्याचाराची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यता पाळणाऱ्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला होता. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले.याच काळात त्यांनी मदवान मास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळीं बरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले होते. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वस्तीगृह त्यांनी सुरू केले होते. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले.पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.

याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला होता.त्यामुळे त्यात त्यांनी समाजात परिवर्तन घडविण्या साठी प्रथम शिक्षण संस्थाची सुरवात केली.त्याच्या कार्याला डॉ नागनाथअण्णा नायकवडी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची प्रथम देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले.आणि हा इतिहास लिहला गेला.

मागासवर्गीय समाजाच्या मुलामुलीला शिक्षण घेण्यासाठी साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली होती. २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.१६,जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.

करवीर नगरीत सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्‍यासाठी सत्यशोधक चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर अण्णा तर राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक समाजाच्या विचाराने भारावलेली एक पिढी त्यांनी घडविली. जेव्हा सातारा जिल्ह्यात सत्यशोधक समाजाने लोक जागृतीसाठी जलसे काढले तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी मागेपुढेही पाहिले नाही. सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधि‍वेशन घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी एक खास संस्था काढण्याची कल्पना मांडली आणि ठराव रुपाने त्या अधिवेशनात त्यास मान्यता मिळाली.अशा रितीने रयत शिक्षण संस्थेचे बीज सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले. वृक्षाखाली गौतम बुध्‍दांना ज्ञान प्राप्त झाले. बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !! हे गौतम बुध्‍दांचे संदेश आहे म्हणून संस्थचे बोधि‍चिन्ह वटवृक्ष आहे.
देशातील भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कराड येथे (संत) सदगुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने “आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन” सुरू केले.

या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. प्रत्येक गावात शाळा बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.हाच आदर्श मराठा समाजा ने कायम डोळ्या समोर ठेवला असतात तर आज राज्यात मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली नसती.कारण आज राज्यात नव्हे तर देशात शाळा महाविद्यालय जरी मराठा समाजाच्या असल्या तरी त्याची शिक्षण देणारी यंत्रणा भटा ब्राम्हणाच्या हाती आहेत. त्यांना बहुजन हिताय बहुजन सुखाय नको आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांना काही पैसेवाल्यानी भरपूर देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.आणि अट टाकली की तुमच्या शाळेचे नांवे बदली करा.तेव्हा त्यांनी काय उतर दिले त्याचा एक लक्षवेधी बोर्ड शाळा,कॉलेजमध्ये दर्शनी भागी लावला असतो.तो विद्यार्थांना नेहमी प्रेरणा देतो.आरक्षण मागणाऱ्यांना आपली जात मागासवर्गीय मध्ये येते हे सिद्ध करावे लागत आहे . सर्वोच्च न्यायालय तो निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे. सरकार कोणाचे ही असो निर्णय न्याय व्यवस्थेला घ्यावा लागेल.आणि एक वेळ निर्णय घेतला तर त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. पुढे अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणी सध्या नसतील.हरकत नाही सर्वाना योग्य न्याय हक्क अधिकार मिळालाच पाहिजे.

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी.लिट.ही पदवी दिली होती.हा ऐतिहासिक इतिहास बहुजन समाजातील लोक विशेष मराठा समाजातील तरुण वाचत नाही.म्हणून त्यांना सांगावे वाटते जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडविण्यासाठी झटतो. लोकसंख्या आणि लोकप्रतिनिधी च्या प्रमाणात मराठा समाज राजकारणात, समाजकारणात,शासन प्रशासनात सर्वत्र एकत्र आल्यास क्रांतिकारी बदल घडवू शकतात.ती मानसिकता वैचारिक पातळीवर निर्णयक झाली पाहिजे.यांचे शेवटचे उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था आहे.ती शिक्षण आणि रोजगार निर्माण करून देऊ शकते तर सर्व मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेले सत्ता स्थापन करू शकतात तसेच अनेक रोजगार देणारे उद्योग धंदे निर्माण करू शकतात.

मागासवर्गीय समाजाची शिक्षण आणि नोकरीतील प्रगती पाहून त्याचे आरक्षण बंद करण्या करिता नाना प्रकारे जनांदोलन उभारल्या जाते.त्यांनी मागासवर्गीय समाजात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक बदल घडविण्यासाठी फुले,शाहू,आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ऐतिहासिक त्याग आणि संघर्ष आहे हे कोणी विसरू नये. म्हणून खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांची २२ सप्टेंबर जयंती आणि ९ मे स्मृतिदिन असतो. पण किती टक्के मराठा तरुण तरुणीला यांची माहिती असते. ज्या तरुण तरुणीनी लाखो लोकांचे नियोजन करून शिस्तबद्ध मोर्चा काढले आहेत. ते कौतुकास पात्र आहेत. पण ते प्रत्येक जिल्ह्यात वेगळे वेगळे आहे, की तेच आहेत. हे मात्र आज पर्यंत जनते समोर आले नाही.मग यांचा खरा नियोजन करणारा कोण?.त्याचे नांव त्यांचा कुशल कौशल्यासह जनते समोर आले पाहिजे होते. हार्दिक पटेल. कैनियाकुमार,जिग्नेश मेगानी इतर बरेच नांवे जनांदोलनामुळे पुढे आले त्यातुन त्यांचा आदर्श,विचारधारा, प्रेरणा कोण आहेत हे जगा समोर आले.पण मराठा क्रांती मूक मोर्चा तुन काहीच पुढे आले नाही. आला तो प्रचंड तिरस्कार. म्हणुन असाच वेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन मे महिन्यात येतो. तो कोण?. कुठे?. कशी?. आठवण म्हणून किती प्रमाणत प्रेरणा घेण्यासाठी साजरा करतात.ही जनजागृती,प्रबोधन एक मराठा लाख मराठा मोहीम मध्ये दिसत नाही. त्यामुळेच मुंबईसह राज्यातील मराठी वृत्तपत्रांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनाची स्मृतिदिनाची सादी दखल घेतली जात नाही.म्हणजे किती मराठी पत्रकार संपादक कोणत्या संताची महापुरुषांची दाखल घ्यावी या बाबत दक्ष आहेत हे दिसून येते. हा लेख स्मृतीदिना निमित्त दरवर्षी मी लिहत असतो, त्यात वर्षभरात शिक्षण संस्था संचालक,शिक्षक,विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिकतेत किती बदल झाला यांची वैचारिक मांडणी करत असतो,आजच्या काळात शिक्षण सम्राट म्हणजे आमदार खासदार असलेच पाहिजे.खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कोणत्याही प्रकारच्या कार्याची बरोबरी हे आमदार खासदार शिक्षण सम्राट करू शकत नाहीत.

इतिहास लपविला म्हणजे तो खोटा ठरत नाही किंवा त्याचे महत्व कमी होत नाही.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार आहे.एक मराठा लाख मराठा यांच्या वैचारिक धेय्य उधिस्टात कदाचीत भाऊराव पाटील आणि त्यांचे शैक्षणिक कार्य बसत नसावे.ते गोरगरीबाला शिक्षण, रोजगार देणारे खरे सम्राट होते. आर्थिक साम्राज्य उभे करून बहुजनांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी पालकांना लुटणारे सम्राट नव्हते. म्हणूनच ते खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील होते.त्यांच्या ९ मे स्मृतिदिना निमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमांना कष्ट,त्याग व जीद्धीला कोटी कोटी प्रणाम!!

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९. भांडूप.मुंबई अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य