प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड केअर सेंटर सुरु करा-आ सौ श्वेताताई महाले पाटील

32

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.4मे):- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संख्येत वाढ होत असून हा आकडा भविष्यात मोठ्या होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. कोविडचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हात उपलब्ध करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेन्टर सुरू करण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहुन केली आहे .

दि 1 मे 2021 मेल व्दारे दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की , कोणत्याही कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयात आज रोजी बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण व तथा त्यांच्या नातेवाईकाना वणवण भटकावे लागत आहे भविष्यात रुग्णांसाठी बेडच उपलब्ध होणार नाही आणि त्या दृष्टीने प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कोरोना केयर सेंटरची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने पाउले उचलल्या जात असल्याचे दिसत नाही. आज रोजी उपचारासाठी दवाखान्याच्या पायऱ्यावर बसून उपचार घावा लागत आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकामध्ये भयावह वातावरण निर्माण होऊन असंतोष पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याकरिता प्रत्येक तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती असून सद्यस्थितीत त्या त्या ठिकाणी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात १० किवा त्यापेक्षा बेडची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यातील अर्धे बेड कोविड रुग्णाच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिल्यास तसेच उर्वरित बेड इतर आजारी असणाऱ्या रूग्णासाठी ठेवल्यास कोरोना आणि इतर आजाराचा सुधा उपचार करणे शक्य होणार आहे.

तसेच या मुळे गावातील पेशंट गावातीलच आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवल्या गेल्याने तालुका किवा जिल्हा आरोग्य यंत्रणे वरील तान कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रावर उपलब्ध जागेच्या अनुषंगाने कोविड केअर सेंटर सुरु करण्यात यावे. तसेच कोविड केअर सेंटर साठी स्वंतत्र वैदकीय अधिकारी कर्मचारी वर्ग देण्यात यावा.

चिखली विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील नागरीकांना सुवीधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चिखली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र अमडापूर, प्रा.आ.केंद्र अंत्री खेडेकर, प्रा.आ.केद्र किन्होळा, प्रा. आ. केंद्र एकलारा, प्रा.आ.केंद्र शेळगाव आटोळ, व प्रा.आ.केंद्र उंद्री तसेच बुलढाणा तालुक्यातील रायपुर आणि चांडोळ तसेच ज्या उपकेंद्रावर जागा उपलब्ध आहे ठिकाणी सुधा कोविड केअर केअर सेंटर सुरु करण्याचीसुद्धा त्यांनी मागणी केली आहे.