कोविड रुग्णांची लूट तात्काळ थांबववून शहरी व ग्रामीण भागात जलदगतीने सरसकट लसीकरण मोहीम राबवा

🔹घनासावंगी भाजपा अनु जा. सेल सरचिटणीस लखन शरणांगत यांची मागणी

✒️जालना,जिल्हा प्रतिनिधी(अतुल उनवणे)

जालना(दि.4मे):- जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार उडाला आहे. रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून अनेक जणांना कोरोना ची लागण होऊन आपले प्राण गमवावे लागले आहेत.कोविड चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात असताना जिल्यातील शासकीय व खासगी रुग्णालये येथे कोविड ची तपासणी करण्यासाठी गेले असता अवाच्या सवा वैद्यकीय बिले लावून रुग्णाची लूट मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
तसेच सरकारी दवाखाना येथे उपचारासाठी गेले असता बाहेरून औषधी आणावयास सांगून लूट केली जात आहे.
असंख्य गोरगरीब रुग्णाची ही होणारी लूट तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा घनसांवगी भाजपाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा अनुसूचित जाती सेल चे तालुका सरचिटणीस लखन शरणांगत यांनी दिला आहे. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष घालून लूट करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

व संबंधित आरोग्य यंत्रणेने लसीकरण मोहीम जलद गतीने राबवून covid-19 चा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करावेत.
सदरील प्रकार तात्काळ ना थांबल्यास माजी आमदार विलासराव (बापू) खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे.
पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क च्या प्रतिनिधीशी बोलताना पुढे म्हणाले की,ग्रामीण भागातून तपासणीसाठी येणारे रुग्ण यांना covid-19 ची लागण झाली आहे असे समजताच त्यांना धडकी भरण्यास सुरुवात होते. ती कोरोना झाला म्हणून नव्हे तर आपल्याला खर्च किती येईल, आपण एवढा खर्च करू शकणार का? शासकीय रुग्णालयात गेलो तर तेथे व्यवस्थित काळजी घेतली जाणार का? या अश्या अनेक भीतीपोटी सामान्य रुग्ण रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करत करत आहे.आणि त्यांच्या परिवारावर मोठे संकट येत आहे.

पुढे बोलताना शरणांगत यांनी असेही म्हटले आहे की शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणेला एक विनंती आहे की आपण सामान्य रुग्णांना होईल तेवढा मोफत उपचार देण्याचा प्रयत्न करा. कारण ही वेळ पैसे कमावण्याची नाही तर आरोग्य यंत्रणेने देवदूत बनून येण्याची वेळ आहे.Covid-19 चा धोका पाहता प्रत्येक गावातील सरपंच , ग्रा. प. सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, स्वयंसेवी संस्था, समाजसेवक यांनी गावातील सर्व लोकांना आपली काळजी आपण घ्यावी असे आवाहन करून यांच्या माध्यमातून आपल्या गावात कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्व ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध गावातील सर्व लोकांना केंद्र सरकारने लस टोचून घ्यावी व आपले गाव लसमुक्त करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणेने लसीकरण मोहीम जलद गतीने राबवून कोरणा नियंत्रण आणण्यासाठी त्वरित पावले उचलावी असे आवाहन केले आहे.

तसेच गावातील सरपंच यांनी आपल्या परीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सतर्क रहा सुरक्षित रहा असे आव्हान करावे.शहरी भागात खाजगी रुग्णालयात जागा उपलब्ध नाही. शासकीय रुग्णालयात तीच परिस्थिती आहे राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे संबंधित यंत्रणा यावर आपले नियंत्रण नसल्याने covid-19 ची लस घेणे दुरापास्त झाले आहे खाजगी रुग्णालयामध्ये लाखों रुपयांची डिपॉझिट ची मागणी केली जाते.रेमडीसेविर चा काळाबाजार थांबला पाहिजे. तिथे ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोरंनटाईन झालेल्या रुग्णासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांचे बेहाल होत आहे असे त्यानी म्हटले. अशी परिस्थिती निर्माण होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे असा आरोप लखन शरणागत यांनी केला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED