मौजा मोहा,वरुड शेत शिवारात जुगार अड्यावर धाड

🔺अनुराग जैन यांची कारवाई

 ✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.4मे):- पासुन जवळ असलेल्या वरूड मोहा येथील शेतात मेरसीगं रामु राठोड यांच्या शेतातील शिवारात बऱ्याच दिवसापासुन सुरू असलेला जुगार या संदर्भीय गोपनिय माहीती मिळताच दिनाक,3 मे 21रोजी अंदाजे 2 वाजताच्या सुुमारास पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांनी आपल्या ताफासह शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग फाडे व पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचुन जुगारा अड्यावर धाड टाकली, त्या मध्ये जुगार अड्यावर खेळतांना सहा आरोपी पकडण्यात आले, प्राप्त माहीती नुसार असी की मोहा वरूड येथील शेत शिवारात मेरसींग रामु राठोड यांच्या शेतात खुप दिवसापासुन जुगार अड्डा चालु होता,या जुगाराची गोपनिय माहीती मिळाली अनुराग जैन यांना माहीती मिळताच आपल्या टिमसह पोलीस कर्मचारी,संदिप चव्हाण,श्रीकांत दुम्हारे,अकाश पाझारे,प्रविण राठोड, निलेश राठोड,सहकारी घेऊन जुगार अडयावर धाड मारली.

त्यामध्ये आरोपी,अँड,अर्जुन थावरा राठोड (नंदपुर,मोहा) अभय रामचंद्र राठोड,वरुड पुसद,संदिप बन्सी जाधव शिवानगर, रामराव नरसीगं राठोड,शिक्षक जी,प, रा,मोहा,कैलास दुलसीगं पवार कातरवाडी, मेरसींग रामु राठोड अश्वीनपुर वरुड असे आरोपीचे नांव असुन हेच जुगार खेळणारे होते, पोलीसानी अचानक गोपनिय माहीती मिळाल्यावरुन धाड टाकण्यात आली,वरील लोकांना ताब्यांत घेऊन त्यांच्या कडील 4, मोटार सायकल, एक 1 फोरव्हिलर,इनव्हा,वाहन 6 मोबाईल,व 21हजार 400 रूपये असा एकून मुद्देमाल जप्त केला, आणी पोलीस उपनिरीक्षक,सतिष बेले,यांच्या फीर्यादीवरुन शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 12 (अ) मुंबई जुगार कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला,सदर जुगार अड्डा हा मागील अनेक दिवसापासुनच सुरू असल्याचे समजते,व सर्वसामाण्य माणसात चर्चत होते,

क्राईम खबर , महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED