जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात 12 कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना मान्यता ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

26

🔸8 शहरांसाठी लहान अग्निशमन गाड्या खरेदीसाठी 2.31 कोटी; प्रा. आ.केंद्रांचे फायर ऑडीट, डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा सह इतर कामांचा समावेश

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

धुळे(दि.4मे):- मे 2021 अखेरीस जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात 10 कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शहरी विभागासाठी 8 अग्निशमन गाड्या खरेदीसाठी 2 कोटी 31 लाखाच्या निधीस मंजूर केल्याने जिल्ह्यातील अनेक नाविन्यपूर्ण 12 कोटीचे नाविन्यपूर्ण मधून कामे होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

🔸8 अग्निशमन गाड्यांची होणार खरेदी
जिल्ह्यात मनपा व नगरपालिका अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेत अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्यासाठी खासदार,आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना धरणगाव, पाचोरा,भडगाव, चोपडा, पारोळा,अमळनेर, जामनेर, शेंदुर्णी या 8 शहरात प्रत्येकी सुमारे 30 लक्ष प्रमाणे 2 कोटी 31 लाखाचा निधी लहान अग्निशमन गाड्या खरेदी साठी मंजूर केला असून लवकरच 8 गाड्यांची खरेदी होणार आहे.

🔹असे आहेत नाविन्यपूर्ण कामं

बहुउद्देशीय डिजिटल दवंडी सायरन यंत्रणा, अभ्यासिका बांधकाम, महिला बचत गटासाठी सभागृह ,जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडीट, स्मशानभूमी तसेच चौका चौकात सिमेंट बाक , रस्त्यालगत व नदी – नाल्यावर संरक्षक भिंतिचे काम, शव पेट्या, गावहाळ ,ओपन जिम व लोखंडी बाक व सार्वजनिक शौचालय बांधकामांचा समावेश आहे. जिल्हा विकासाच्या इतर योजनेतून जी कामे घेता येत नाही अशी कामे नाविन्यपूर्ण योजनेतून घेता येतात.