म्हसवड शहरात “मनमाड पेटर्न”, विनाकारण फिरणाऱ्याची केली जातेय “कोविडं टेस्ट”

27
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.5मे):-राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत असताना सातारा जिल्ह्यात पण कोरोना रुग्ण वाढीने उच्चान्क गाठला असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात काल पासून सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे तरी सुदधा म्हसवड शहरात नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत त्यामुळे म्हसवड नगर परिषद आणि म्हसवड पोलीस स्टेशन यांनी संयुक्त मोहीम राबवत विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांची जागेवरच “कोविडं टेस्ट” करणेस सुरुवात केली.जिल्ह्याबरोबरच माण तालुक्यात कोरोना रुग्ण वाढीने जोर धरला असून रुग्ण संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही याला नागरिक जबाबदार असल्याचे दिसत आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना रुग्ण वाढीस आळा बसावा म्हणून कालपासून जिल्ह्यात सात दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे परंतु म्हसवड शहरात्त नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहेत. यामध्ये पॉजिटीव्ह रुग्ण फिरताना दिसत आहेत त्यामुळे पूर्वीच्या ‘स्प्रेड’चे रूपांतर ‘सुपर स्प्रेड’ मध्ये होताना दिसत आहे त्यामुळे रुग्णसंख्यापन मोठ्या प्रमाणात वाढत आहे.रुग्ण संख्या वाढिवर आळा घालण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशनकडून शहरात नाकेबंदी करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांकडून आणि नागरिकाचेकडून दंड वसूल केले तरी लोक शहरात फिरतानाचे प्रमाण कमी झाले नाही लोकं या ना त्या कारणांनी शहरात फिरतच आहेत.
आज पोलीस कारवाईत 50 पेक्षा जास्त वाहनावर कारवाई करणेत आली.याच कारणांनी म्हसवड नगरपरिषद आणि म्हसवड पोलीस स्टेशन यांनी संयुक्त उपक्रम राबवित आज शहरात “मनमाड पेटर्न” राबविला आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची “कोविडं टेस्ट” करणेस सुरुवात केली.यात अनेक लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या ज्याची टेस्ट पोजिटिव्ह आली त्यांना “कॉरटाईंन सेंटर”ला पाठविण्यात आले.विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करणेत आले.
यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चागलाच वचक बसल्याचे दिसले.यापुढे दररोज हि मोहीम राबविणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.या मोहिमेत म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन माने,शिवराज भोसले,रियाज मुल्ला,गणेश म्हेत्रे,सागर सरतापे,रोहित बारवसे तर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे,पो.कॉ. एस.पी.बागल आणि पोलीस स्टाफ उपस्थित होते.