बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली रूग्णवाहिका

29

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.5मे):-अशोकराव चव्हाण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली.राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रूग्णवाहिका मंजूर झाल्या असून, त्यातील १ रूग्णवाहिका बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रूग्णवाहिकांचे प्रातिनिधिक लोकार्पण झाले. या रूग्णवाहिकांमुळे ग्रामिण रूग्णांना मोठी मदत होईल.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून नांदेड जिल्ह्याला नव्याने नांदेड जिल्हास एकून ५२ रूग्णवाहिका प्राप्त झाल्या .या पैकी एक आपल्या बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णवाहिका प्राप्त झाली आहे. त्याबद्दल मा. सरपंच बालाजी मदेवाड ,जिल्हा परिषद सदस्य विजयश्री कमठेवाड, मा.पंचायत समिती सभापती वंदना पवार, डाॕ. पबितवार सर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.