सुप्रीम कोर्टाने मूठभर श्रीमंत व पुढारलेल्या मराठ्यांना समोर ठेवून निकाल दिला – माणिक माधवराव पा चव्हाण

22

✒️नायगांव प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.५मे):- राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सुप्रीम कोर्टात रद्द करण्यात आला, ही मराठा समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे.राज्य मागास आयोगाच्या सर्व्ह नुसार राज्यात गाव, वाडा, वस्ती वर राहणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, सामान्य व श्रीमंत मराठ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते व त्यानूसार राज्य मागास आयोग व गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारशी नुसार मराठा समाज हा मागास असल्याचे स्पष्ट होते.

परंतु मराठा आरक्षणाचा मूळ पाया असणाऱ्या या शिफारशी कडे मात्र हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात दुर्लक्ष करत फक्त मराठा समाजातील मूठभर श्रीमंत लोकांकडे बघून सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे.व 30 वर्षांपूर्वीच्या इंद्रा सहानी खटल्याला समोर ठेवून ५० % च्या वर आरक्षण देता येणार नाही असे कारण देण्यात आले.परंतु 30 वर्षांनंतर बदललेली सामाजिक व आर्थिक परिस्थिती ही न्यायालयाने ग्राह्य धरलेली नाही.या निर्णयाने समाजात गंभीर प्रतिक्रिया उमटतील व याला जबाबदार केंद्र व राज्यातील सर्वपक्षीय नेतेच आहेत असे स्पष्ट मत माणिक पाटील चव्हाण नायगांवकर यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले