जिल्हाअधिकारी याच्या आदेशाचे सार्वजनिक कामगार कार्यलया मार्फत पायमल्ली भिम आर्मी चे जिल्हा अधिकारी यांना निवेदन

23

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.5मे):-एकेकडी जिल्हाधिकारी व प्रशासन घरी राहण्याचे आव्हान करत आहे ,तर दुसरीकडे सरकारी कामगार कार्यलयामार्फत पायमल्ली होताना दिसत आहे.विशेष म्हणजे शासनाने कामगारांना त्याचे अर्ज ऑनलाईन करण्यास सांगितले लोकांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ते अर्ज शासकीय नियमानुसार जे अर्ज 15 ते 20 दिवसात घ्याचे ते प्रबलित ठेऊन काही ऍजेट व काही विशिष्ट संघटनेचे अर्ज या कार्यलया मार्फत काढण्यात आल्याचे समजले जाते ,त्यामुळे 7 ते 8 महिन्यापासून प्रलंबित राहिलेले अर्ज आता कोरोना च्या काळात निकाली काढण्यात येत आहे,त्यामुळे आता कोरोना च्या काळात कामगार अधिकारी व कर्मचारी यांनी कामगार जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे ,उद्या जर एखाद्या कामगारांना कोरोनाची लागवन झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार ?अगोदर च या कार्यलया मार्फत कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे सोमोर येत आहे.

त्यामध्ये असे गर्दी चे वातावरण योग्य नाही ,दिवसभर भर उन्हात सकाळ पासून उपाशी पोटी उभे राहत असलेल्या लोकांना कार्यलयामार्फत कोणतीच ( पाण्याची ,सावली मध्ये उभे राहण्याची ,सोशल डिस्टन,हॅन्डवास ) सुविधा केलेली नाही ,एकीकडे सरकारी कामगार सुविधा केंद्र किरायाच्या घरावर लाखो चा खर्च आणि सामान्य जनतेसाठी एक पाणी सुविधा पण नाही ,कामगार कार्यलयात मार्फत नोंदणी झालेल्या कामगारांना पोस्टामार्फत किंवा संघटनेच्या माध्यमातून कार्ड वाटण्याची सुविधा करावी ,जेने करून कार्यलयात गर्दी होणात नाही .असे भिम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात येत आली आहे ,निवेदन देताना जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक्के, बंटी रंगारी ,महासचिव राज मून ,दीक्षित सोनटक्के ,आशिष रणधीर ,शेहबाज शेख ,अक्षय हुमने ,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते