भाजपा कार्यकर्त्यांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा हिंगणघाट शहरात निषेध

33

🔹नायब तहसीलदार समशेर पठाण यांचे मार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले भाजपाने निवेदन

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.5मे):-पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर *भारतीय जनता पक्षाच्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या* कार्यालयावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा हिंगणघाट विधानसभा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला.या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना क्षती पोहचवून जी अशोभनीय परंपरा पश्चिम बंगालमध्ये अखिल भारतीय तृणमुल काँग्रेसने चालवीली आहे अश्या अराजक कृत्याचा *भारतीय जनता पार्टी हिंगणघाट* विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

सबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी *आमदार समिर कुणावार* यांचे मार्गदर्शना नुसार निषेधात्मक निवेदन नायब तहसीलदार समशेर पठाण यांचे मार्फत उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांना देण्यात आले.*निवेदन देतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे,नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,भाजपचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे समुद्रपुर तालुका अध्यक्ष संजय डेहणे,नगरसेवक चंद्रकांत मावळे* इत्यादि मान्यवर निवेदन देतेवेळी उपस्थित होते.