परभणीतील इनायतनगरचे लसीकरण केंद्र ठरतेय आदर्श -उप विभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर

19

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

परभणी(दि.5मे):/येथील इनायत नगरमधील महानगरपालिकेच्या रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावरील लसीकरणाचे नियोजन, शिस्तबध्दता यामुळे हे केंद्र आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर सर्व महिला कर्मचारीच नियुक्त आहेत हे या केंद्राचे मुख्य वैशिष्ट आहे.

इनायतनगरच्या लसीकरण केंद्राची मंगळवारी (ता. चार) उप विभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रावरील नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व महिला कर्मचारी असतांनाही कुठेही नियोजनात कमी नाही याचे त्यांनी कौतूकही केले. डॉ. कुंडेटकर यांनी या केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी चहाची मशिन व वाफ घेण्याचे यंत्र भेट म्हणून देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले.