मनाने पराभूत ममता बॅनर्जी विजय देखील पचवता यायलाच हवा – आ.ॲड.आकाश फुंडकर 

27

🔺निषेध निषेध निषेध

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)मो:-7770010084

पश्चीम बंगालच्या प्रत्येक कार्यकर्त्या सोबत संपुर्ण देश खंबीरपणे उभा आहे.नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जीचा पक्ष हा सर्वात जास्त उमेदवार निवडुण पुन्हा सत्तेत आला आहे. परंतु या विजयाची मस्ती टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्या अंगात आली असून निकाल लागल्यापासून पश्चीम बंगाल येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या गेल्या, सामुहिक बलात्कार सुरु आहेत. भाजपा कार्यालयांची जाळपोळ सुरु आहे. त्यामुळे विजयी होऊनही मनाने पराभूत ममता बॅनर्जींना सांगावेसे वाटते की, विजय देखील पचवता यायला हवा. तो पचवता येत नसेल तर विजयाचा उन्माद हा लोकशाहीची हत्या करणारा ठरतो.

आज *पश्चीम बंगाल येथे सुरु असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे संपुर्ण देशात धरणे आंदोलन व निषेध* व्यक्त करण्यात येत आहे. पश्चीम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर तसेच ज्या व्यक्ती भाजपा समर्थक आहेत किंवा भाजपाचे मतदार आहेत अशा व्यक्तींवर त्यांच्या घरांवर व मालकत्तांवर हल्ले करुन मारहाण, लुटपाट हत्या बलात्कारांचे सत्र सुरु झाले आहे. दोन दिवसात 20 कार्यकर्ते व भाजप समर्थक नागरीकांच्या हत्या केल्या गेल्या त्यामुळे ही एकप्रकारे लोकशाहीची हत्या असून या देशाचा नागरीक हा कोणत्याही पक्षाचा समर्थक किंवा मतदार असू शकतो. तो त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु आज पश्चीम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळविलेले यश पाहून मनाने हरलेल्या ममता बॅनर्जी यांचा तोल सुटला असून त्यांचे कार्यकर्ते हे संपुर्ण पश्चीम बंगालमध्ये हिंसाचार पसरवून दहशत ‍ निर्माण करीत आहे.

या घटनेचा निषेध संपुर्ण देशातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत असून देशभरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे पश्चीम बंगालच्या भाजपा पदाधिकारी व भाजप समर्थीत जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत. वेळ आली तर संपुर्ण देशातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे पश्चीम बंगाल येथे जाण्यास तयार आहे. ममता बॅनर्जींना वाघीण संबोधणारे नेते महाराष्ट्रातील नेते हे आज या हिसाचाराबददल मौन का ? तसेच प्रत्येक गोष्टीवर मेणबत्या घेऊन हिंडणारे मोर्चे काढणारे आज पश्चीम बंगालमध्ये हिंसाचार माजलेला असतांना गप्प का आहेत ?असा सवालही *जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड आकाश फुंडकर* यांनी ‍ विचारला आहे.

यावेळी भाजपा सोशल मिडीया प्रदेश सहसंयोजक *श्री सागरदादा फुंडकर* तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, भाजप जिल्हा विद्यार्थी आघाडी पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, महेंद्र रोहनकार, शांताराम बोधे, विनोद टिकार, जि प डॉ गोपाळ गव्हाळे, , नगरसेवक विलास देशमुख, राजेंद्र धनोकार, गणेश जाधव, जितेंद्र पुरोहित, गणेशभाऊ सोनोने,अनिस जमादार, किसन शर्मा , उमेश चांडक, सतीश गवळी, ओमसेठ खंडेलवाल, हितेश पद्मगिरवर, यश आमले, प्रसाद एदलाबादकर, रोहन जैस्वाल, परितोष डवरे,शुभम देशमुख, संदीप त्रिवेदि,राजेंद्र भैय्या, विकास हटकर,विक्की हटटेल, श्री मारवे, विनय शर्मा पवन राठोड,निलेश हाटेकर, योगेश आळशी,चेतन नागेश्वर, रोशन गायकवाड, बाला परदेसी, पवन तनपुरे,श्रीकांत जोशी,आशिष सुरेखा, विक्की रेठेकर,चंदू भाटिया,मंगेश सावरकर,विक्की चौधरी,आकाश बडासे यांच्यासह *भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती* होती.