लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण

21

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.6मे):- परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीकरांसाठी ‘सेवाधर्म – सारं काही समष्टीसाठी’ (समाज हितासाठी) हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत आज (दि.६) मोफत सिटिबस चे लोकार्पण करण्यात आले.’सेवाधर्म – सारं काही समष्टीसाठी’ (समाज हितासाठी) या उपक्रमांतर्गत परळीतील नागरिकांना लसिकरण केंद्रपर्यंत जाणे येणे साठी मोफत सिटी बस सेव सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय दुर होणार आहे.

आज (दि.६) मोफत सिटिबस चे लोकार्पण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे,बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,सुरेशअण्णा टाक,बाशित भाई,अॅड. जीवनराव देशमुख,चेतन सौंदळे,शंकर कापसे,रवि मुळे,धम्मा अवचारे,नागेश हालगे, आदी उपस्थित होते.