सर्च आॅपरेशन दरम्यान ३१लाखाचा मूद्देमाल जप्त

26

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.6मे):-पोलिस विभाग यांचे कोंबिंग आॅपरेशन चालु असतांना खामगाव ग्रामीण ,शहर,शिवाजी नगर शेगाव पोलिस स्टेशन च्या संयुक्त कार्यवाहीने ३2लाखाचा खबाड कार्यवाही दरम्यान जप्त जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांचे मार्गदर्शनाखाली खामगाव ग्रामिण च्या वतिने अंञज गावामध्ये सकाळी कोंबिग आपरेशन राबविण्यात आले.

यात नगदी रक्कम २६लाख चारहजार चारशे पन्नास रुपये,पिवळ्या धातु च्या गिन्न्या अंदाजे किंमत १८०००/-रुपये,पांढर्या धातुचे दागिने एकलाख रुपये,सोन्याचे दागिने तिन लाख रुपये,२६मोबाईल किमंत सत्तर हजार रुपये,देशी बनावटीचे दोन पिस्तुल सहा राऊन्ड किंमत ५९०००/-रुपये,दोन तलवारी किंमत दोन हजार रुपये,लोखंडी धारदार सुरे किमत तिन हजार रुपये,टोकदार भाले कुर्हाड किंमत दोन हजार चारशेरुपये, टेकस्मो मोटर किंमत २१०००/-रुपये,३१,७९,८५० रुपये चा एकुण घबाड पकडण्यात आला.

यावेळी हेमराज राजदुत,अमोल कोळी,ग्रामिण पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार रफिक शेख, शहर पोलिस स्टेशनचे सुनिल अंबुलकर ,शिवाजी नगर ठाणेदार सुनिल हुड, शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले,हिवरखेड चे पो. नि. प्रविण तळी,सर्व पो.ऊ नि. गोकुल सुर्यवंशी,गौरव सराग,सुवर्णा गोस्वावी,योगेश द्वदे,परसपगार,कातकाडे ,ऊयपविभागातील पोलिस अंमलदार,आर सि सि पथक यासह कर्मचारी पथकाने हि कार्यवाही केली, या कार्यवाहीने संपुर्ण जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे