विनामास्क फिरणाऱ्या 87 जनविरूद्ध सिरसाळा पोलिसांची कार्यवाही

25

✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.8मे):-तीन दिवसांची कडक संचार बंदी असताना सुध्दा विना मास्क मोकार फिरणाऱ्या मोटरसायकलीसह 87 जणाविरुद्ध एकूण 18 हजार 200 रुपयांचा दंड आकारून सिरसाळा पोलिस स्टेशनचे एपीआय एकशिंगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विघ्ने, पो का विष्णु फड यांनी कार्यवाही केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ,लॉकडाऊन च्या काळात शासनाचे आदेश न पाळत विना मास्क मोकार फिरणाऱ्या सीरसाळा येथील अंबेडकर चौकामध्ये एपीआय प्रदीप एकशिंगे, पीएसआय महेश विघ्ने, विष्णु फड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील मोकार फिरणारे अंदाजे 87 मोटरसायकलीवर कारवाई करून 18 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला एपिआय प्रदीप एकशिंगे यांनी सिरसाळा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दहा दिवसांमध्येच सिरसाळा गावांमध्ये लॉकडाऊन च्या काळात सामान्य जनतेवर वचक निर्माण करून गावामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण केले आहे. या धडाकेबाज कार्यवाही मुळे विनामास्क मोकार फिरणाऱ्यांना चांगलाच चोप बसला आहे