सिरसाळयात हातभट्टी अड्डा उद्धवस्त-पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांची कार्यवाही

26

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

सिरसाळा(दि.8मे):-सोनपेठ रस्त्यावरील नाल्यालगत गावठी दारू च्या अड्डयावर छापा मारून 600 लिटर रसायन नष्ट केले ही कार्यवाही सिरसाळा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या नेत्रतवाखाली गुरुवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आली या प्रकरणी एका जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनपेठ रस्त्यावर सिरसाळा शिवारात एका नाल्या लगत हातभट्टी काढणी सुरु असल्याची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांनी पो कॉ अर्शद सय्यद यांना सोबत घेऊन ठिकाण गाठले गावठी दारू ने भरलेले बॅरल लाकडी काठीने फोडून त्यातील सहा हजार लिटर दारू उलथून दिली. दारू तय्यार करणाऱ्या या महाशयांनी जवळच असणाऱ्या नाल्यात दारूने भरलेले काही बॅरल लपवून ठेवली होती ती सुध्दा या पथकांनी नष्ट केली.

जवळपास 30 हजाराचे रसायन या कार्यवाहीत उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आले दरम्यान पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या फिर्यादीवरून दीपक मदन गायकवाड यांच्या विरुद्ध गावठी दारू तय्यार केले महनुन सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे