चंद्रपूर जिल्ह्यात (दि.8मे) रोजी 24 तासात 2001 कोरोनामुक्त, 1160 कोरोना पॉझिटिव्ह तर 21 कोरोना बधितांचा मृत्यू

52

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.8मे):-जिल्ह्यात मागील 24 तासात 2001 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1160 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 70 हजार 548 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 54 हजार 448 झाली आहे. सध्या 15 हजार 10 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 8 हजार 623 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 33 हजार 474 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 35,52, 58,69 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला. कोतवाली वार्ड येथील 34 वर्षीय पुरुष, तुकुम येथील 58 वर्षीय पुरुष, कृष्णा नगर येथील 38 वर्षीय पुरुष.वरोरा तालुक्यातील 42, 57, 80 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील 80 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 18, 35 वर्षीय महिला.
नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील 60 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील धरमपूर येथील 50 वर्षीय पुरुष, भंगाराम तळोधी येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष. आरमोरी गडचिरोली येथील 70 वर्षीय महिला तर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1080 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 996, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 31, यवतमाळ 37, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया एक आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1160 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 373, चंद्रपूर तालुका 99 , बल्लारपूर 75, भद्रावती 91, ब्रम्हपुरी 49, नागभिड 19, सिंदेवाही 46, मूल 54, सावली 46, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 09, राजूरा 73, चिमूर 47, वरोरा 86, कोरपना 57, जिवती 10 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 548 कोरोनामुक्त, 22 मृत्यूसह आज ( 8 मे ) 431 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली(दि.8मे):-आज जिल्हयात 431 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 548 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25018 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 20232 वर पोहचली. तसेच सद्या 4258 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 528 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 22 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय पुरुष लाझेडा गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष एटापल्ली , 38 वर्षीय महिला कढोली ता.कुरखेडा , 56 वर्षीय पुरुष ता.शिंदेवाही जि.चंद्रपूर , 71 वर्षीय महिला आरेवाडा ता.भामरागड, 78 वर्षीय पुरुष बेलगाव ता.कोरची, 48 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय पुरुष गडचिरोली, 36 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, 60 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी, 75 वर्षीय महिला कुरखेडा, 57 वर्षीय पुरुष आरमोरी, 57 वर्षीय पुरुष गडचिरोली, 45 वर्षीय महिला सिरोंचा, 75 वर्षीय पुरुष वडसा, 68 वर्षीय पुरुष सिरोंचा, 68 वर्षीय पुरुष कोटगल गडचिरोली, 75 वर्षीय महिला वसंतपूर ता.मुलचेरा, 69 वर्षीय पुरुष एटापल्ली, 60 वर्षीय पुरुष अहेरी, 65 वर्षीय महिला धानोरा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.87 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.02 टक्के तर मृत्यू दर 2.11 टक्के झाला.

नवीन 431 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 106, अहेरी तालुक्यातील 70, आरमोरी 66, भामरागड तालुक्यातील 09, चामोर्शी तालुक्यातील 36, धानोरा तालुक्यातील 12, एटापल्ली तालुक्यातील 27, कोरची तालुक्यातील 04, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 23, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 7, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 25 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 46जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 558 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 132, अहेरी 56, आरमोरी 38, भामरागड 14, चामोर्शी 72, धानोरा 17, एटापल्ली 48, मुलचेरा 26, सिरोंचा 28, कोरची 10, कुरखेडा 58 तसेच वडसा येथील 52 जणांचा समावेश आहे.