औषध निर्मिती क्षेत्रात हैदराबाद येथे काम करणारे राम माने यांनी केली शाळेचे सफाई

22

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी बीड जिल्हा)मो- 8080942185

केज(दि.8मे):-केज तालुक्यातल्या बनसारोळा गावातील सामाजिक कार्यकर्ते राम सुरेश माने यांनी केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अंगणातील केली सफाई . कोरोणा विषाणूमुळे शाळा बंद आहेत व त्यामुळे शाळेचा परिसर अस्वच्छ दिसुन आल्याने राम माने यांनी केली शाळेच्या परिसरात सफाई.एक आगळा वेगळा आदर्श समाजा पुढे राम माने यांनी ठेवला आहे.

हैदराबाद हुन भावाच्या लग्नासाठी आलेल्या राम मानेने समाजापुढे स्वच्छतेचा आदर्श ठेवला आहे. लॉकडाउनच्या काळात गुप्रने स्वच्छतेचे काम करणे शक्य नसल्याने राम माने यांनी गावात कुणालाही चार्च न करता स्वच्छतेचा विडा उचलला आहे. बनसारोळा गावातील स्वच्छतेचा पहिला विडा उचलणारे राम माने होय . कोरोणा विषाणूचा संसर्ग लक्षात घेवून बनसारोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राम माने यांनी स्वच्छता केल्यामुळे यांचे सर्वत्र बनसारोळा परिसरात कौतुक होत आहे.