भारतात 5G परिक्षणावर बंदी हवी

24

जगात हाहाकार माजलेला कोरोना आटोक्यात येत असल्याच्या बातम्या ऐकिवात असताना,भारतात मात्र अजूनही या कोरोनाची लाट ओसरायला तयार नाही. संगीत खुर्चीचा खेळ चालल्यागत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कोरोनाची वाटचाल सुरूच आहे.सुरुवातीला गर्दीमुळेच हा कोरोना पाय पसरतोय त्यासाठी वैयक्तिक अंतर राखणे हा त्रिसूत्री मधील एक महत्वाचा उपाय आहे असा प्रचार अहोरात्र कानावर आदळत राहिल्याने अनेकांनी धसकाच घेतला. लोकांनी भीतीपोटी तसे अंतर राखून अनेक मित्र, आप्तेष्टांना दूर ठेवले. इतके दूर ठेवले की,अगदी आपल्या जन्मदात्यांचे अंतिम दर्शन आणि संस्कारालाही फाटा दिला गेला आहे. त्यातच देशभर टाळेबंदी लावल्यामुळे सगळा आर्थिक गाडाच ठप्प झाल्याने संपूर्ण देशात एक गूढ आणि भयावह स्थिती निर्माण झाली आहे. लोकांना एकमेकांच्या जवळ येण्याची भीतीच डोक्यात बसल्यामुळे अनेक आस्थापना बंद ठेवाव्या लागल्या.

परंतु एवढा सगळा कारभार ठप्प झालेला असताना माणसं एकमेकांपासून दुरावली असताना गर्दीत न जाणा-या आणि घरबसल्या ठिकाणी सर्व सुख सुविधा उपभोगणा-या सुखवस्तु कुटुंबातील व्यक्तींना देखील कोरोनाने मिठी मारण्याचे प्रमाण वाढताना पहायला मिळते.आणि दुसरीकडे मुंग्या सारख्या दाटीवाटीने लाखो लोकांच्या झुंडीच्या झुंडी नेत्यांच्या,खुद्द प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत रॅलीत विना मास्क खुशाल हुंदडत फिरतात. त्यावरुन कोरोनाचे नेमकं रुप कोणतं आणि कारणं कोणती हेच सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचं आहे असं वाटायला लागलं आहे.एकटं असताना संसर्ग होण्याचा धोकाही नाही आणि गर्दीत संसर्गापासून सुटका नाही.हे कुणाही शाळकरी मुलाला कळण्यासारखी गोष्ट आहे.

अशावेळी काही तज्ञ वैज्ञानिकांनी व्यक्त केलेल्या शंकांवर गांभीर्याने विचार केले पाहिजे.तज्ञांच्या मते कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक असल्याने मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत असल्याची जी वार्ता सगळीकडे पसरवली गेली आहे,त्याप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट असली तरी वास्तवात ते एकमेव कारण नसून 5 जी च्या परिक्षणामुळे टॉवर मधून बाहेर पडणारे रेडिएशन बरोबर विषारी वायुंचे घटक हवेत मिसळल्यामुळे हवेत विषारी वायूचे प्रमाण वाढते आहे. परिणामी अशा हवेच्या वातावरणात अनेकांना श्वसनाचे विकार होत आहेत.आणि आधीच कमकुवत तब्येत आणि दीर्घ आजारपण असणा-यांवर याचा वेगाने विपरीत परिणाम होऊन लोक मोठ्या प्रमाणात दगावत/मृत्युमुखी पडत आहेत. 5G इंटरनेटची चाचणी जवळपास सर्वच देशांत करण्यात येत असल्यामुळे या 5G चाचणीमुळे अनेक देशांत नागरिकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

मृत्युही मोठ्या प्रमाणात झाले आहेत.त्यामुळे अनेक देशांनी 5G परिक्षणाना विरोध दर्शवला आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशातही 5G नेटवर्कच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. काही देशांनी तर ते परिक्षण थांबविले आहे. आणि यामुळेच परदेशात कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे याकडे कानाडोळा करता येणार नाही.भारतातही 5G इंटनरेनट टॉवर उभारुन चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी भारतातून होत आहे. या चाचणीला बंदी घालण्याबाबतची जनहित याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत.

या चाचण्यांमुळे अनेकांच्या घरातील वस्तुंमध्ये वीज प्रवाहीत झाल्यासारखे होऊन हलकेसे धक्के बसत आहेत.अनैकांना वरचेवर तहान लागण्याचे प्रमाणही वाढत आहेत.महत्वाचे म्हणजे या नेटवर्कमुळे आपल्या गोपनियतेवरही मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. गोपनिय माहिती आणि आपला डेटा चोरिला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या 5G नेटवर्क चाचण्यांसाठी मॅग्नेटिक रेडिएशनचा वापर करुन चालवण्यात येत असल्यामुळे अधिक रेडिएशनमुळे नागरिकांमध्ये कॅन्सर, गर्भावस्थेत असणाऱ्या महिला आणि मुलांच्या वर वाईट परिणाम होत आहेत. दहशतवाद्यांना माहिती चोरण्यासही या नेटवर्कची मदत होऊ शकेल या आणखी एका आणि अत्यंत महत्वाच्या धोक्याकडे दुर्लक्षूनही चालणार नाही.जर आपल्या देशात 5 जी च्या चाचण्या थांबवल्या तर ब-याच जणांचे फुफ्फुस आणि श्वसनाचे विकार कमी तर होतीलच. त्याचबरोबर ऑक्सिजन टंचाईचा खेळखंडोबाही कमी होण्यास मदत होईल.

4 जी च्या आगमना नंतर आपल्या चिवचिवाटाने सकाळचे वातावरण प्रसन्न करणा-या चिमण्यांचा आपण मुकलोय आहोतच.आता 5 जी मुळे अख्या मानवजातीवरच संकट ओढवलेले आहे.माणसं रोज आपल्या आवडत्या व्यक्तींना गमावत आहेत.तेव्हां सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करुन वैज्ञानिक तज्ञांचा सल्ला घेऊन 5 जी च्या चाचण्या त्वरित थांबविल्या पाहिजेत. येणारी तिसरी लाट केवळ कोरोनाचीच असणार आहे या भ्रमात न राहता कोरोनाशी सामना करण्याबरोबरच आपल्या देशात 5 G नेटवर्कच्या चाचण्या त्वरित थांबविले तरच मृत्युचे तांडव थांबणार आहे. अन्यथा वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू है सगळे व्यर्थ ठरणार आहेत. इतकेच

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(कार्य.सदस्य)मराठी विज्ञान परिषद सोलापूर.