दि.८ ते १३ मे पर्यंत कडक संचारबंदी लागू- पोलीस बंदोबस्त चोख

32

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि..८मे):-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज दि.८ ते १३ मे पर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून आज प्रथम दिवशीच संचारबन्दी सफल झाल्याचे दिसुन येत आहे.याचे संपूर्ण श्रेय पोलिस यंत्रणेला जात असून जनता पोलिसांच्या दंडुकेशाहीलाच घाबरत असल्याचे निदर्शनास येत आहे.पोलिस यंत्रणा आज सकाळपासुनच रस्त्यावर उतरली असून ठाणेदार संपत चव्हाण हे सुद्धा स्वतः कारवाई करतांना दिसले.

शहरात पोलिसांनी अनेक विनाकारण रस्त्यावरती येणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली,यात पुरुष तसेच महिलांचासुद्धा समावेश होता.रस्त्यावर तसेच चौकाचौकात पोलिस तसेच होमगार्ड सैनिक उन्हाची पर्वा न करता कडक पहारा देत कोरोना श्रृंखला खंडित करण्यासाठी प्रयत्नशील दिसुन आले.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी या कोरोनायोध्याच्या चहा,पाणी तसेच अल्पोपहाराची व्यवस्था केली.