आज शहादा येथे भव्य रक्तदान शिबिर यशस्वी संपन्न

25

🔸जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व युवकमित्र परिवाराचा उपक्रम

✒️नंदुरबार(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नंदुरबार(दि.9मे):- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदूरबार व युवकमित्र परिवार कोठली ता.शहादा यांच्यातर्फ जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ३० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.यावेळी उदघाटक म्हणून शहादा नगरपालिकेचे गटनेते मकरंदभाई पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार हिरालाल रोकडे,रमाशंकर माळी, हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, ईश्वर वारुडे,छत्रपती ब्लड ग्रुपचे रामकृष्ण पाटील,टोकरे कोळी युवा मंचचे सस्थापक नितीन कोळी,कोठली येथील युवा नेते राहुल पाटील,बादलसिंग गीरासे,अभाविपचे प्रीतम निकम,युवकमित्र चे सस्थापक प्रवीण महाजन,मनोज वारुडे,प्रकाश वारुडे हे उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद लसीकरण काळातही तब्बल 30 युवकांनी रक्तदान केल्याबद्दल युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी रक्तदात्याचे आभार व्यक्त केले.रक्तसंकलनकामी शासकीय जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्राचे डॉ.गोविंद शेळके,डॉ.सागर वसावे,डॉ.शशिकांत पाटील,जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण,जयेश सोनवणे,रुग्णसेवक लखन तेंजी, शरद पवार यांचे सहकार्य लाभले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपालसिंग गिरासे, प्रकाश वारुडे,दिनेश माळी यांनी परिश्रम घेतले.