जिंनिंगला अचानक आग लागून लाखो रुपयांचे मालाची नुकसान

25

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)

हिंगणघाट(दि.9मे):-हिंगणघाट तालुक्यातील गिमाटेक्स इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय महामार्गावरील येरला येथील जिंनिंगला आज अचानक आग लागून तेथे असलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.आज दुपारी अंदाजे २.३० चे दरम्यान आग लागली असून आगीने लगेच रौद्ररूप धारण केले.आगीची माहिती मिळताच वडनेर पोलिस घटनास्थळी पोचली असून आग आटोक्याट आणण्यासाठी अग्निशमन सेवेला पाचारण करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच गिमाटेक्स इंडस्ट्रीजचे हिंगणघाट येथील काही वरिष्ठ अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोचले असल्याची माहिती आहे.सदर घटना शार्टसर्किट मुळे घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आगीत झालेल्या नुकसानीची माहिती मिळू शकली नाही.