गायमुख व गट ग्रामपंचायत मधुकर नगर या गावात घाणीचे साम्राज्य,गटविकास आधिकारी लक्ष देतील का ?

29

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.10मे):-मधुकर नगर परिसरातील व गावतल्या घरांना लागुन असलेल्या नालीचे पानी रस्त्यावर,
ग्रामपंचायत गायमुख नगर प्रशासनाचे दुर्लक्ष,
पुसद,ग्रामपंचायत गायमुख नगर हद्दित येत असलेल्या मधुकर नगर येथे सार्वजनिक नाल्यांचे सांड पाणी रस्त्यावर साचत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास भोगावा लागत आहे, त्या मागील महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायत गायमुख नगर प्रशासन व शासन या कडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत त्यामुळे सदर परिसरात वास्तव्य करणारे नागरिकांच्या अरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

अगोदरच कोरोना महामारी ने सम्पूर्ण राज्यात थैमान घातला असून महाराष्ट्र शासन जनतेच्या अरोगगया ची काळजी घेत आहे मात्र संबंधित प्रशासन व शासन हे नागरिकांना नागरी सुविधा देण्या साठी अपवाद ठरले आहे,मागील अनेक वर्षा पासून सार्वजनिक नाल्यांचे काम रखड़ले आहे या बाबतीत परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा, स्थानिक लोक प्रतिनिधि यांना तोंडी तक्रारी दिल्या आहे मात्र झोपेचे सोंग घेतलेले हे लोकप्रतिनिधि यांना केव्हा जाग येईल असा प्रश्न सदर परिसरातील नागरिकांना पडला आहे,त्या मुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत गायमुख नगर ग्रामपंचायत लोकप्रतिनिधि यांना चांगलाच फटका बसणार हे विशेष,