चंद्रपूर जिल्ह्यात (दि.10मे) रोजी 24 तासात 2019 कोरोनामुक्त, 691 कोरोना पॉझिटिव्ह तर 15 कोरोना बधितांचा मृत्यू

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.10मे):- जिल्ह्यात मागील 24 तासात 2019 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 691 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 15 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 72 हजार 419 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 58 हजार 618 झाली आहे. सध्या 12 हजार 684 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 14 हजार 259 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 38 हजार 58 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 55 वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 30 वर्षीय महिला. घोटनिबांळा 75 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला, गडचांदूर येथील 58 वर्षीय पुरुष. कोरपना तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 29 व 85 वर्षीय पुरुष.
नागभीड तालुक्यातील कच्चेपार येथील 50 वर्षीय पुरुष, नवेगाव पांडव येथील 39 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील 65 वर्षीय पुरुष तर वडसा गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1117 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1031 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 34, भंडारा 10, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 691 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 252, चंद्रपूर तालुका 47 , बल्लारपूर 65, भद्रावती 01, ब्रम्हपुरी 20, नागभिड 17, सिंदेवाही 59, मूल 10, सावली 35, पोंभूर्णा 04, गोंडपिपरी 52, राजूरा 02, चिमूर 33, वरोरा 11, कोरपना 61, जिवती 04 व इतर ठिकाणच्या 18रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात(दि.10मे) रोजी 559 कोरोनामुक्त,15 मृत्यूसह आज (10मे)167 नवीन कोरोना बाधित

गडचिरोली,(जिमाका)दि.10: आज जिल्हयात 167 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 559 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 25612 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 21290 वर पोहचली. तसेच सद्या 3765 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 557 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 15 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 81 वर्षीय पुरुष, ता. धानोरा जि. गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील 70 वर्षीय महिला, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि.गडचिरोली येथील 75 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 36 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 85 वर्षीय पुरुष, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.

यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.13 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.70 टक्के तर मृत्यू दर 2.17 टक्के झाला.नवीन 167 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 104, अहेरी तालुक्यातील 8, आरमोरी 5, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 21, धानोरा तालुक्यातील 5, एटापल्ली तालुक्यातील 0, कोरची तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 4, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 8, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 4 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 6 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 559 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 181, अहेरी 47, आरमोरी 53, भामरागड 8, चामोर्शी 38, धानोरा 21, एटापल्ली 31, मुलचेरा 29, सिरोंचा 27, कोरची 22, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 74 जणांचा समावेश आहे.