पालक मंत्री दत्ता भरणे यांनी लावली दोन जिल्हात भांडणे

35

🔹अतुल (भाऊ) खुपसे-पाटील यांच्या समजूतदारपणामुळे मोठा अनर्थ टळला

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.10मे):-उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी पळवण्याचा घाट राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी घातला आणि त्यासाठी सरकारकडून मंजूरीही मिळवली. याच्याविरुद्ध सोलापुरातील शेतकरी आक्रमक झाले आणि मा. अतुल खुपसे पाटील,मा.प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभे राहिले.

आज दि. ११ रोजी राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी शेतकरी नेत्यांना सिंचन भवन पुणे येथे बैठक साठी बोलावले होते. या बैठकीला जात असताना अतुल खुपसे- पाटील यांची सत्तेचा गैरवापर करून एखाद्या आतंकवाद्याची तपासणी केली जाते तशी दोन वेळेस तपासणी केली गेली. बैठकीत सोलापूर आणि इंदापूर येथील शेतकर्यांमध्ये वाद पेटवण्याची पूर्ण तयारी दत्ता भरणे यांनी केली होती.पण अतुल खुपसे-पाटील यांच्या समजूतदारपणामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्यांना समजावून सांगितले आणि मोठा अनर्थ टळला.