मराठा चेंबर ऑफ कॉमर्सकडून जिल्ह्याला 50 ऑक्सिजन काँसंट्रेटर आणि 5 बायपॅप

26

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

वर्धा(दि.10मे):- अखिल भारतीय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जिल्ह्यासाठी 50 ऑक्सीजन काँसंट्रेटर आणि 5 बायपॅप पाठविण्यात आलेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात ते प्राप्त झाले असून आवश्यक असणाऱ्या रुग्णालयाला ते वितरित करण्यात येतील.

जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या आणि साधनांची कमतरता बघता अनेक संघटना पुढे येऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. कालच दर्शना स्वयं सहायता महिला बचत गटाने सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला ऑक्सिजन काँसंट्रेटर, जल शीतल, आणि जल शुद्धीकरण यंत्र भेट दिले.

तर आज मुंबई येथून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांनी जिल्ह्यासाठी कोविड उपचाराकरिता आवश्यक असलेली वैद्यकीय सामग्री पाठवली आहे, ज्यामुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होईल. या बहुमूल्य मदतीसाठी जिल्हाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानलेत. इतरांनी सुद्धा सामाजिक जाणिवेतून अशा संकटाच्या काळात कर्तव्य भावनेने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.