शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका सत्यभामा गाङेकर याचं कोरोनाने निधन

27

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11मे):-शिवसेना उतर महाराष्ट्र महिला आघाडी च्या प्रमुख व नाशिक महानगरपालिका च्या जेष्ठ नगरसेविका सत्यभामा गाङेकर वय वर्षे ५६ याचं दि.10 मे रोजी कोरोना ने निधन झाले आहे त्याच्या पश्चात पती ,दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.नाशिक जिल्ह्यात आक्रमक महिला शिवसैनिक म्हणून त्या ओळखल्या जात होत्या नाशिक रोङ प्रभाग बावीस मध्ये विविध विकासाचे कामे करून नावलौकिक कमावला होता

निष्ठावंत महिला शिवसैनिक म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केला होता जिल्ह्यातील व उतर महाराष्ट्र ग्रामीण भागात शिवसेना विस्तार करण्यांत मोठा सहभाग होता राज्यात भाजपा व शिवसेना युतीची सत्ता असताना सत्यभामा गाङेकर प्रत्येक तालुक्यात स्वतः हजेरी लावत असतव बैठका घेत असत नाशिक महानगरपालिका च्या तब्बल तीन वेळा नग नगरसेविका राहिल्या आहेत.

शिवसेनेच्या मुलुख मैदान तोफ म्हणून त्यांची ओळख होती वर्षे भरापुर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारी दिली होती स्थायी समिती च्या विद्यमान सदस्य होत्या. साधारण एक महिना पुर्वी शिवसेनेच्या जेष्ठ नगरसेविका कल्पना पांङे यांचे ही कोरोना मुळे निधन झाले होते पांङे व गाङेकर यांची जोडी महापालिकेत प्रसिद्ध होती महिनाभराच्या अंतराने शिवसेनेच्या दोन जेष्ठ नगरसेविका यांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याने शिवसैनिक व संबधित सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते याना धक्का बसला आहे