गंगाखेड तालुक्यात दिव्यांग व वयोवृद्ध करिता ड्राईव इन् लसीकरण राबवण्यात यावी

25

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11मे):-तालुक्यात दिव्यांग व वयवृद्ध करिता ड्राईव इन् लसीकरण राबवण्यात यावी कोविड१९ हया महामारीचा पदुर्भाव रोखण्यासाठी व त्याचा प्रसार होऊ नये म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर लसीकरण होत आहे परंतु लस घेण्यासाठी लस केंद्रावर खुप गर्दी होताना दिसत आहे नागरिकांना रांगेमध्ये तासनतास थांबावे लागत आहे या मुळे दिव्यांग व वयवृद्ध यांना अडचणीला समोर जवे लागत आहे.

यामुळे मुबई महानगर पालिकेच्या धर्तीवर गंगाखेड तालुक्यात ड्राईव इन् लसीकरण सुरू करून दिव्यांग व वयवृद्ध यांना जेथे आहेत त्या ठिकाणी जावून लसीकरण केल्यास त्यांच्या अडचणी दूर होतील आसे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड यांना प्रहार अपंग क्रांती अंदोलन यांनी दिले असून या निवेदनावर नामदेव काळे, राहुल साबणे,बाबा साळवे,रोहिदास लांडगे, अतिश खंदारे,उत्तम काळे, यांच्या स्वाक्षरीे आहेत.