सरकारला पाहिजे त्या प्रकारचे मनुष्यबळ पुरवू

27

🔹डेमोक्रॅटिक रिपाईची टीम श्रमदानास सज्ज

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.11मे):-कोविड संसर्गाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेत कोरोनाशी लढण्यास मनुष्यबळ कमी पडत असेल तर पाहिजे त्या प्रकारचे मनुष्यबळ सरकारच्या मदतीला मोफत देऊ अशी माहिती राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या आदेशावरून पहिल्या लाटेत पहिल्याच दिवसापासून ज्या प्रमाणे स्वयंसेवक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे शेकडो पदाधिकारयांनी कोरोनाशी झुंज दिली, प्रभाग श्यानेटाईज केले, लागण झालेल्यांना कोरोन्टाईन तर आवश्यक रुग्णाला ऍडमिट करून त्यांचा परिसर सील केला.

हजारोना भोजन, अन्नदान, फळे वाटप केली, रमजान च्या रोजा मध्ये मुस्लिम बांधवांची विशेष अशी काळजी घेतली गेली. कोरोना प्राथमिक चाचणी, ताप प्राणवायू आदी तपासणी, अंबुलेन्स उपलब्धी, फोनवर कोरोना निश्चिती, काळजी व उपाययोजना असे कामे विना पगार केली. यावेळी असंख्य रिपब्लिकन स्वयंसेवकांना सुदधा कोरोनाणे ग्रासले होते.

याही लाटेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे सर्व शाखांतील पँथर्स रिपब्लिकन कार्यकर्ते विनापगारी श्रमदान करण्यास सज्ज असून सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन पुन्हा सेवेत पाचारण करावे अशी इच्छा डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.

“बिन पगारी पूर्ण अधिकारी” या ब्रीद वाक्याला अनुसरून कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागील काळात जशी टीम योजनाबद्ध काम करत होती तशीच टीम यावेळी संपूर्ण देशात तेथील रिपब्लिकन कार्यकर्त्यास राबविन्याचे आदेश पक्षप्रमुख कांबळे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

इस्पितळे, आरोग्य विभागाशी संलग्न संस्था यांना कुणाला अशी टीम पाहिजे असल्यास स्थानिक कार्यकर्त्यांशी समन्वय साधावा असे जाहीर आवाहन राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.