उद्योजक पै.श्रीमंतराव गलंडे यांच्या मार्फत शेनवडी येथील गरजू 113 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

37

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

खटाव(दि.11मे):-शेनवडी ता. खटाव जि.सातारा येथील राजस्थान स्थित उद्योजक पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष पै.श्रीमंतराव गलंडे यांनी सामाजिक बांधीलकीचा वसा जपत शेनवडी गावातील 113कुंटुंबियांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्याचा वसा ऐन कोरोनाकाळात हाती घेतला असून या कार्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

यापुढील काळात महिन्याच्या प्रत्येक रविवारी ते शेनवडी गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाच्या माध्यमातून हे काम करणार आहेत. याकामी त्यांना धनगर समाजातील त्यांचे सहकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ उपाध्यक्ष श्री उत्तम सातपुते पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचे खजिनदार श्री किरण सातपुते, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ खटाव तालुका अध्यक्ष श्री संजय सातपुते माजी सरपंच श्री किसन घोडके, , दादासो सातपुते, विकास सातपुते, शंकर सातपुते, प्रशांत सातपुते ,सोमनाथ घागरे,वैभव घोडके, वैभव खांडेकर ,समाधान सातपुते,संदीप सातपुते,दिपक घागरे,रोहित सातपुते व शेनवडी ग्रामस्थ व इतर सहकारी मदत करत असून नियमाचे पालन करून गरजू कुटुंबांना घरोघरी. जाऊन जीवनावश्यक साहित्य पोहचविण्याचे काम हे सर्वजण करीत आहेत.

यावेळी बोलताना पै.श्रीमंतराव गलंडे म्हणाले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे कार्य आपण व माझ्या सहकार्यांनी हाती घेतले आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी ही एकूण चार टप्यांमध्ये प्रत्येक रविवारी हे वाटप आपण करणार आहोत. यासाठी सुमारे एक लाख रुपये किराणा साहित्य वाटपासाठी खर्च करणार आहेत.पै.श्रीमंतराव गलंडे राबवत असलेल्या या उपक्रमाचे शेनवडी गावात कौतुक केले जात आहे.