✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.11मे):-रेमडीसीवीरचा दररोज होणारा काळाबाजार , ज्या गरीब रुग्णांचा स्कोर 20 किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्यांची ऐपत नाही अशांना इंजेक्शन न मिळता ज्यांचा 1 किंवा 2 किंवा शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे 9 च्या खाली स्कोर असतांना त्यांना रेमडीसीवीर मिळत आहे . ज्यांच्या कडे पैसे आहेत ते लोक जास्त पैसे देऊन रेमडीसीवीर लग्गा लावून खरेदी करीत आहे . यामध्ये गरीब रुग्णांचे मरण होत आहे.टंचाईमुळे गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची हॊणारी ससे होलपट, तसेच खासगी डॉक्टर कोरोनाच्या नावावर करीत असलेली जास्तीची बिले देऊन होणारी लूट थांबवुन नागरिकांना दिलासा व न्याय देण्यासाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे.
दि 11 मे 2021 रोजी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी कोरोना जिल्हा आढावा बैठकीत जे ठरते त्याची अंमलबजावणी खालुन होत नसल्याने केवळ चर्चा न करता ठोस उपाययोजना करण्यासाठी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर आणून ठेवली . यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती , अतिरिक्त व जिल्हाधिकारी गोगटे , निवासी जिल्हाधिकारी दिनेश गीते , उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे , तहसीलदार रुपेश खंदारे , अन्न व औषधी विभागाचे बर्डे , घिरके , कुणाल बोन्द्रे , नगरसेवक गोविंद देव्हडे यांची उपस्थिती होती .
दि 9 में 2021 रोजी पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या सोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली या अगोदरही आढावा बैठकीमध्ये जे ठरवले त्याप्रमाणे कालपर्यंत अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे . 9 तारखेला घेतलेल्या बैठकीमध्ये रेमडीसीवीर ज्या रुग्णाला दिले गेले त्याची रिकामी व्हाईल परत घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या . याबाबत आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी काल दि 10 में 2021 रोजी चिखली तालुक्याची बैठक घेतली असता याबाबत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे आमदार श्वेता ताई महाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय काढून याबाबत थेट जिल्हाधिकारी यांच्याशी विचारणा केली . आढावा बैठकीतील सूचनेच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी कोणत्याही यंत्रणेने केलेली नाही.
त्यामुळे डॉक्टरांवर धाक राहिलेला नाही . चिखली मध्ये रेमडीसीवीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे . बेडसंख्या कमी असताना रुग्ण संख्या जास्त दाखवून रेमडीसीवीरची इंजेक्शन जास्त घेऊन त्याचा काळाबाजार करून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची अनेक तक्रारी आलेल्या आहेत . तसेच खासगी डॉक्टर अव्वाच्या सव्वा बिले घेत असल्याने त्यांची तक्रार करायची कोठे ? याबाबत चर्चा करण्यात आली असता प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली लेखाधिकारी व अन्य अधिकारी यांच्या समितीने बिले तपासून घेण्यासाठी तक्रार केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
गरिबांचा जीव स्वस्त आहे का ? आ सौ श्वेताताई महाले यांचा सवाल जिल्ह्यात कुठेही रुग्णांना त्यांच्या स्कोर प्रमाणे रेमडीसीवीर न मिळता गरीब श्रीमंत असा भेद करून इंजेक्शन दिले जाते . जो जास्त पैसे देईल त्याला इंजेक्शन मिळते . यामुळे गरीब रुग्णांना रेमडीसीवीरची आवश्यकता असतांनाही ते जास्त पैसे देऊ शकत नाही परिणामी त्यांना इंजेक्शन मिळत नाही . लोकप्रतिनिधी यांनी सांगून ही गरिबांच्या नावाने मिळालेले इंजेक्शन त्याला मिळत नसल्याने गरिबांचा जीव स्वस्त आहे काय असा सवालही आ सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी केला .
रेमडीसीवीरचे तहसीलदार यांच्या नियंत्रनात वाटप करावे . आ सौ श्वेताताई महाले
रेमडीसीवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि रुग्णांना त्यांच्या स्कोर प्रमाणे इंजेक्शन मिळावे यासाठी डॉक्टरांकडून दररोज प्रत्येक पेशंटची माहिती घेवून शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे कुणाला इंजेक्शन देणे गरजेचे आहे हे ज्या रुग्णांचा स्कोर जास्त त्याच रुग्णाला जिल्हाधिकारी किंवा प्रत्येक तहसीलदार यांच्या स्तरावर ठरवून रेमडीसीवीर दिल्या गेले पाहिजे . रेमडीसीवीर देतांना जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही मेडिकल वर इंजेक्शन न देता प्रत्येक तहसीलला विक्रीचे काऊंटर सुरू करून त्या मार्फतच इंजेक्शन द्यावे जेणेकरून रास्त व कोणतेही अतिरिक्त किंमत न देता वेगवेगळ्या कंपन्यांनी ठरवून दिलेल्या किंमतीत मिळेल आणि रुग्ण व नातेवाईक यांची लूट होणार नाही असा आग्रह आ सौ श्वेताताई महाले यांनी धरला आहे.