संतशिरोमणी हरदेव बाबा : शांती सुखाचा सांगावा

27

(संत निरंकारी समर्पण दिन)

निरंकारी बाबा संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराज एक अध्यात्मिक सद्गुरु होते, ज्यांनी साऱ्या दुनियेला शांती सुखाचा सांगावा पोहोचविला. मानवता व विश्वबंधुत्वाला पुढे रेटले. बाबाजींनी सन १९८० ते सन २०१६ पर्यंत संत निरंकारी मिशनचे प्रमुख म्हणजेच सद्गुरू पदावर आरूढ राहून मानवतेची सेवा केली आणि मानव मात्रांपर्यंत मानव कल्याणचा संदेश प्रवाहित केला. त्यांनी संपूर्ण जगाला जागविले की मानवताच प्रत्येक धर्माचा आधार आणि मानवता धर्मच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. बाबाजींनी विश्वातील अखिल मानवा मात्रांना एका रंगात रंगविण्याचे अविश्रांत प्रयत्न केले. त्यांनी संत निरंकारी मिशनला भारता पुरतेच मर्यादित न ठेवता साऱ्या जगभर प्रसारित केले. केवळ मिशनच नाही तर जन कल्याणाच्या विविध सामाजिक कार्यांतूनही समाजाची सेवा केली. जेणेकरून मानवता जीवित राहिल, विश्वशांती प्रस्थापित होईल व जगात बंधुभाव वाढीस लागू शकेल.

निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराजांचा जन्म दि.२३ फेब्रुवारी १९५४ रोजी दिल्लीमध्ये पिता बाबा गुरुबचन व माता कुलवंत कौर यांच्या घरी झाला. बाबाजी आपल्या चार बहिणींचे एकुलते एक भाऊ होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रोटरी पब्लिक स्कूल दिल्लीत तर त्यानंतरचे शिक्षण पटियालाच्या यादवेंद्र स्कूलमध्ये झाले. बाबाजींनी दिल्ली युनिव्हर्सिटीतून उच्च शिक्षण प्राप्त केले. ते खुपच सरळ आणि सहज स्वाभावांचे धनी होते. त्यांच्या या सन्मार्गी व अध्यात्मिक विचारांमुळेच त्यांना कुटुंबीय आणि मित्रमंडळीही भोला म्हणत असत. घरी अध्यात्माची ज्ञानगंगा अखंड वाहत होती. अध्यात्माच्या या ज्ञानात डुबकी मारून बाबा हरदेवसिंहजींनी सन १९७१मध्ये निरंकारी सेवादलात सहभाग घेतला व त्यांनी जनसेवेचा शुभारंभ केला. दि.१४ नोव्हेंबर १९७५ला त्यांनी आपल्या प्रापंचिक जीवनाची सुरुवात केली. निरंकारी भक्तांच्या परिवाराशी जुळून सुंदर, सुशील व कर्तव्यदक्ष सविंदर कौरजींना आपल्या जीवनसाथीच्या रूपात अंगिकारले. याप्रमाणे त्यांच्या जीवन प्रवासाला सहप्रवासी मिळाला.

म्हणून संपूर्ण निरंकारी जगतात आनंदआहे तरंग उठू लागले. मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात, तसेच मनुष्य जीवनाचेही काही सांगता येणे कठीण असते. केव्हा सुखाच्या राशी पडतील आणि केव्हा दुःखाचे डोंगर कोसळेल! बाबा गुरबचनसिंहजींच्या बलिदानाने चौफेर हाहाकार मचला आणि सर्वत्र शोककळा पसरली. अशा या दुःखद घटनेपासून बाबा हरदेवसिंहजी महाराजांच्या सद्गुरु पदाचा महान प्रवास सुरू झाला. कितीही कठोर परीक्षा असू द्या, सिद्धपुरुष तिच्यात खरा उतरतोच! बाबाजींच्या पुढ्यातसुद्धा अशीच परिस्थिती ऊभी ठाकली होती. दि.२७ एप्रिल १९८० रोजी साधसांगतची सेवा करणाऱ्या बाबा हरदेवसिंहजी महाराजांना सद्गुरुचा पोषाख चढवला गेला. निराश, हताश व शोकाकूल हृदयांची सांतवणा सोपवण्यात आली. तरीही बाबाजींनी बाबा बूटासिंहजी महाराजांकरवी सुरू केलेल्या निरंकारी परंपरेच्या त्या विशाल वृक्षाला अलगद सांभाळले. ज्यावर बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या अवतार वाणीची पुष्पे डोलत होती, ज्यावर बाबा गुरुबचनसिंहजी महाराजांनी आपल्या रक्ताने सिंचन केले होते.

हे एक फार कठीण काम होते, हिंसेची शिकार झालेल्या भक्तांना अहिंसेचे ज्ञान देणे. आजच्या काळात जेव्हा धर्माच्या नावावर अधर्माचा बोलबाला आणि सर्वत्र अशांतीचे विशाल नागफणे डोलू लागले आहेत. बाबा हरदेवसिंहजी महाराजांच्या वचनांचे वेगळेच महत्व आहे. ते संत निरंकारी मिशनचे चौथे सद्गुरू होते. म्हटले आहे – सम्पूर्ण हरदेव बाणी : पद संख्या १०६ – “सेवा सत्संग सुमिरण जो भी प्रेम से करते जाते हैं। कहे ‘हरदेव’ सदा वो कायम भक्ति को रख पाते हैं।।”बाबाजी नेहमी ‘वसुधैव कुटुम्बकम’च्या तत्वांचा प्रचार करत होते. त्यांचे मत असे होते की माणुसकीच सर्व धर्मांचा पाया व आधारस्तंभ आहे. हाच निरंकार आहे, जो प्रत्येक मनुष्याच्या हृदयात आहे. म्हणून माणसांची कदर व सेवा शुश्रूषा करा. निरंकारी जगतात हिंदू, मुस्लिम, सिक्ख, ख्रिश्चन, बौद्ध अशा सर्व धर्मोचे लोक सहभागी झाले आहेत, ही अनुयायी संख्या जवळपास २ करोडपेक्षाही अधिक आहे. बाबाजींनी आपली मधूर वाणी व अथक प्रयत्नांच्या बलबुत्त्यावर आज विश्वाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मिशनचे अस्तित्व प्रस्थापित केले आहेत. सुख शांतीचा सांगावा जगभर प्रसारित केला. संत निरंकारी मिशन मानवासाठी ते द्वार आहे, जेथे निरंकार परमात्म्याचा आधार मानून कोणतीही जात-पात पाहिली जात नाही, कोणाचा धर्म नाही किं पदवी नाही! बस, एकच वस्तू पाहिली जाते, ती म्हणजेच मानवता! म्हटलेच आहे – सम्पूर्ण हरदेव बाणी : पद संख्या २३९ – “मानवता के बिना कोई भी मानव न कहलायेगा। कहे ‘हरदेव’ मानवता से ही मानव बन पायेगा।”

सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराजांच्या आदेशानुसार निम्न क्षेत्रात त्यांच्या भक्तांकडून सेवाकार्ये केले जात आहेत – रक्तदान, वृक्षारोपण, फ्री हेल्थ चेक उपसेवा, स्वच्छता, स्कूल, कॉलेज, संकटकाळी धन-राशी दान, महिला व युवा सशक्तिकरण अशा बऱ्याच क्षेत्रांत मिशनद्वारे मुक्तसेवा केली जाते. या कार्यांमुळे समाज व शासनाद्वारे खुप कौतुक केले जाते. ब्लड डोनेशनमध्ये निरंकारी मिशनची फार मोठी भूमिका आहे. जिला सन २०१६च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली. कारण बाबा हरदेवसिंहजी महाराज सांगत – “खून नाड़ियों में दौड़ना चाहिए, नालियों में नहीं।“ सद्गुरु बाबाजी साऱ्या विश्वात पसरलेला निरंकारी समुदाय तथा सांसारिक लोकांना शांती समाधानाचा पाठ पढविला. बालपणापासून जगभरात मानवतेचा संदेश पोहोचविला आणि मानव एकतेचे बीजारोपण केले. आजच्या दिवशी अर्थात दि.१३ मे २०१६ ला मॉट्रियल कॅनडात एका कार अपघाताचे निमित्त घडून त्यांनी पंचतत्वांचे शरीर त्यागून ब्रह्मलीन झाले. जगात प्रेम, विश्वबंधुता, मिलवर्तन, मानवता आदी दैवी गुण शिकविणाऱ्या एका मसीहाला पारखे व्हावे लागले. कारण – “कर्ज चुकाया जा नहीं सकता, हरदेव तेरे अहसानों का!”

निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराजांचे चरित्र आम्हाला मानव व मानवतेला समर्पित जीवन जगण्याची व मानव मात्रांशी प्रेम करण्याची शिकवण देत आहे. आपण अखिल मानवांशी मिळुनमिसळून बंधुभावाने राहिले पाहिजे. का? तर धर्माच्या नावावर जर का आम्ही कोणाशी झगडू लागलो, तर आम्ही मंदिर, मस्जिद, भगवान, अल्लाहला सुद्धा बदनाम करीत असतो. म्हणूनच यावर विश्वास ठेवा की आपण सगळी माणसे एकाच निरंकार परमात्म्याची संतान आहोत व आम्ही सर्व एकाच इश्वराची लेकरे आहोत. बाबाजी म्हणतात – सम्पूर्ण हरदेव बाणी : पद संख्या १२५ – “प्रेम गली में आने वाला जीते जी मर जाता हैं। प्रभु का ऐसा प्रेमी साधो मरकर जीवन पाता हैं।।” …. धन निरंकार जी!

✒️संकलक व लेखक:-चरणरज : ‘बापू’- श्रीकृष्णदास निरंकारी.C/o प.पु.गुरूदेव हरदेव कृपानिवास,मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली, जिल्हा – गडचिरोली, व्हा.नं.९४२३७१४८८३.