ग्रामीण भागात लोन देणाऱ्या प्रायव्हेट फायनान्स कंपनीचे हप्ते दोन ते तीन महीने थांबवावे

27

✒️शेगाव(बु)प्रतिनिधी(विनोद उमरे)मो:-87669 21326

शेगाव( बु)(दि.12मे):-वरोरा तालुक्यातील शेगांव ( बु ) येथे प्रायव्हेट कंपनीचे लोन वाटप केले असुन दर हप्ते १६०० ते १७०० रुपये हप्ते भरावे लागत आहे ,कोरोना १९ विषाणूंचा प्रादुर्भाव सगळीकडे चालू असल्यामुळे हाताला काम नाही बेरोजगारी आर्थिक मंदी चा सामना करावा लागत आहे तरी कोरोनाचा काळ लक्षात घेता, प्रायव्हेट फायनान्स कंपनी कडून होणारी सक्तीची वसुली दोन ते तिन महिन्याकरता थांबविण्यात यावी.

या करिता शेगाव (बु )प्रहार महिला आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी वरोरा यांना प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक,सौ.गिताताई फुलकर, सौ.रंजना सोनुने, सौ.सिधु मडावी, श्रीमती.सुनिता काटे,सौ.चदाताई फुलकर, सौ.शोलुताई महसे,रजीयाॅं पठान,छमो नासीर शेख सौ.सुषमा दातरकर उपस्थित होते