जंगली डुकराच्या हल्यात युवक गंभीर जखमी

24

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)

नागभिड(दि.13मे):- तालुक्यातील बोन्ड येथिल युवक तेंदु पत्ता गोळा करण्यासाठी दि 12 मे रोजी सकाळी 9 च्या सुमारास जंगलात गेले असता बाळापूर वनपरिशेत्र 71 मध्ये जंगली डुकराने हल्ला करून जयशंकर केवळराम गुरपूडे (वय 45 वर्ष) या युवकांस डुकराने गंभीर जखमी केले.

त्यात जखमी युवकांला उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बाळापूर वरून पुढील उपचार करण्यासाठी जयशंकर केवळराम गुरपूडे या युवकाला डॉ.नांगरे ब्रम्हपुरीला उपचारास पाठविण्यात आले व त्या ठिकाणी मोका चौकशी पंचनामा अहवाल फाॅरेस्ट ऑफिसर वाघमारे साहेब,चौधरी यांनी केला.