डॉ. आशीष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलची पोलिस संरक्षणात चौकशी करा- जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

23

✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी):-7770010084

खामगाव(दि.13मे):-शहरातील सामान्य रुग्णालयाची पाहणी करन्याकरीता जिल्हाधिकारी महोदय आले होते, त्यावेळी आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल च्या विरोधातील तक्रार करते गुड्डू बोबडे यांनी व सत्यप्रत संपादक आनंद गायगोळ प्रखर प्रहार चे संपादक किरण मोरे, राष्ट्रवादीचे रविकांत माहुलीकर यांनी जिल्हाधिकारी यांना डॉक्टर आशिष अग्रवाल याने लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये अवैध कोवीड सेंटर चालवून रुग्णाचा चुकीचा उपचार केल्या प्रकरणी अनेक रुग्णांनाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे रुग्णालयावर कार्यवाही करण्याकरिता चौकशी समिती नेमली होती परंतु दि 12 मे पर्यंत काहीच चौकशी झाली नाही.

याची कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना देताच कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तिथेच हजर असलेल्या उपविभागीय अधिकारी राजेंद्रजी जाधव व निवासी वैद्यकीय अधीक्षक निलेश जी टापरे यांना सुचना करत तात्काळ पोलिस बंदोबस्त घेवून डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल ची चौकशी करण्याचे आदेश दि 12 मे रोजी खामगांव येथील सामान्य रुग्णालयात दिले, आता डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्यावर अवैध पने कोवीड सेंटर खोलून रुग्णांवर चुकीचा उपचार करून अनेक रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला खामगांव चे लाईफ लाईन हॉस्पिटल वर लवकरच कार्यवाही होणार आहे असे दिसत आहे.